Karnataka Elections :कर्नाटकात एमआयएम लढवणार २५ जागा; 'या' पक्षासोबत युतीच्या चर्चा

MP Asaduddin Owaisi
MP Asaduddin Owaisie sakal

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यावेळी कर्नाटकात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने या विधानसभा निवडणुकीत जवळपास 25 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचेही ठरवले आहे.

MP Asaduddin Owaisi
Rupali Patil: "जनताच तुम्हाला गोमुत्र पाजून लायकी दाखवेल"; रुपाली पाटील 'त्या' घटनेवर भडकल्या

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उस्मान गणी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचा पक्ष जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबत निवडणुकीत युती करण्याचा विचार करत आहे. मात्र, अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आतापर्यंत आम्ही तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. आम्ही निवडणुकीत युतीसाठी तयार आहोत. आम्ही निवडणूक नक्कीच लढवू. आमची युती होणार की नाही, त्यासाठी आम्हाला वाट पहावी लागेल.

MP Asaduddin Owaisi
Shivsena News: न्यायालयाच्या निकालानंतर होणार मोठी उलथापालथ; भाजपच्या क्रमांक दोनच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष घनी म्हणाले की, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडी(एस) सोबत निवडणूक युतीसाठी पक्षाची चर्चा सुरू आहे, परंतु अद्यापपर्यंत जेडी(एस) ने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. ते म्हणाले की, पक्ष राज्यात सुमारे 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. विशेष म्हणजे 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत AIMIM ने JD(S) ला पाठिंबा दिला होता आणि उमेदवार उभा केला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com