esakal | कर्नाटकचे मंत्री म्हणतात, भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना गोळ्या घालण्याचा कायदा करा
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka minister calls for new law against those who raise pro-Pakistan slogans

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसी पाटील यांनी यासंदर्भात कायदा करण्याची मागणी केली आहे. गुलबर्गा येथे झालेल्या सभेत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिली होती. त्यानंतर तिच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ही मागणी करण्यात येत आहे.

कर्नाटकचे मंत्री म्हणतात, भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना गोळ्या घालण्याचा कायदा करा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंगळूर : भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना जागेवरच गोळ्या घालण्याचा कायदा करा, अशी मागणी कर्नाटकचे कृषीमंत्री बीसी पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसी पाटील यांनी यासंदर्भात कायदा करण्याची मागणी केली आहे. गुलबर्गा येथे झालेल्या सभेत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिली होती. त्यानंतर तिच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ही मागणी करण्यात येत आहे.

मोठी बातमी  "डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

पाटील म्हणाले, की माझ्यामते अशा घोषणा देणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची गरज आहे. अशा घोषणा देणाऱ्यांना जागेवरच गोळ्या घातल्या पाहिजेत. पाकिस्तानच्या समर्थनार्थ किंवा भारताविरोधी ते घोषणाच कशा देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी मी लिहिणार आहे. 

मोठी बातमी - पाकिस्तानी एजंटचा ई-मेल, ७ जण भारतात करणार दहशतवादी हल्ला...

loading image