Karnataka News : सत्तेवर येताच काँग्रेस 'ते' पाच आश्वासन पूर्ण करणार, मंत्रिमंडळाची बैठकीत मंजूरी

DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal

karnataka news : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. त्यानंतर सत्तेवर येताच काँग्रेसने प्रचारादरम्यान दिलेले पाच आश्वासान पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सरकारने आज (शुक्रवार) ही घोषणा केली आहे.

काँग्रेसने कर्नाटकात पाच आश्वासने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राज्यातील जनतेला पाच आश्वासने दिली होती. याबाबत आज म्हणजेच शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारही उपस्थित होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, निवडणुकीच्या वेळी आणि त्याआधी आम्ही ५ आश्वासने दिली होती. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि मी हमीपत्रावर स्वाक्षरी केली आणि आश्वासन दिले की आम्ही सर्व आश्वासने अमलात आणू आणि ती लोकांपर्यंत पोहोचू. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आम्ही आमच्या पाचही आश्वासनांची सखोल चर्चा केली. आम्ही ठरवले आहे की चालू आर्थिक वर्षात पाचही हमींची अंमलबजावणी केली जाईल.

DK Shivakumar Siddaramaiah
Coromandel Express Accident : ओडिशात भीषण अपघात! मालगाडीला एक्स्प्रेसची धडक, अनेकजण अडकले

आम्ही पाचही आश्वासने लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. १ - 'गृह ज्योती', जी १९९ युनिटपर्यंतच्या घरांसाठी वीज बिल भरण्यापासून सूट देण्यात येईल. ही योजना १ जुलैपासून लागू होईल. दुसरी योजना 'गृहलक्ष्मी' आहे. याद्वारे कुटुंबातील महिला प्रमुखाला सरकार २००० रुपये देणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

काँग्रेसने दिले होते हे आश्वासने -

काँग्रेसने निवडणुकीत कर्नाटकमधील कुटुंबाला २०० युनिट पर्यंत मोफत वीज (गृह ज्योती योजना), प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला २००० रुपये मासिक मदत (गृहलक्ष्मी योजना), दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा १० किलो मोफत तांदूळ, अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील प्रत्येक पदवीधर बेरोजगारांना दोन वर्षांसाठी दरमहा ३००० हजार रूपये आणि पदविकाधारक (युवा निधी योजना) १५०० रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली होती.

DK Shivakumar Siddaramaiah
Baby Ariha : जर्मनीत अडकलेली बेबी अरिहा लवकरच भारतात परतेल! परराष्ट्र मंत्रालयाचं आश्वासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com