'स्वतःचं नाव धर्मनिरपेक्ष जनता दल ठेवलं आणि जातीवादी पक्षाशी हातमिळवणी केली'; BJP-JDS युतीवर मुख्यमंत्र्यांचा प्रहार

‘धजद’ ही भाजपची ‘बी-टीम’ आहे.
Karnataka Politics CM Siddaramaiah
Karnataka Politics CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

'धजदकडे कोणतीही विचारधारा नसल्याचा आणि सत्तेसाठी काहीही करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.'

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केल्याबद्दल धजदवर टीका केली. धजदकडे कोणतीही विचारधारा नसल्याचा आणि सत्तेसाठी काहीही करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असा आरोप केला.

Karnataka Politics CM Siddaramaiah
Neelam Gorhe : सत्तेत होता, तेव्हा आरक्षण का दिलं नाही? आता फडणवीसांना खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर निशाणा

हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘धजद’ ही भाजपची ‘बी-टीम’ आहे. आणि ते या आघाडीने सिद्ध केले आहे. धजदला भाजपची ‘बी-टीम’ म्हणायचो, आता ते सिद्ध झाले आहे. ‘बी-टीम’ म्हटले तर धजद माझ्यावर नाराज होईल. त्यांनी स्वतःचे नाव धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) जनता दल ठेवले. पण जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे.’’

धजदचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) म्हणायचे की, धजद कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. पण आता धजद सुकाणू समितीचे प्रमुख आणि आमदार जी. टी. देवेगौडा यांनी पक्षाच्या अस्तित्वासाठी भाजपसोबत युती आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Karnataka Politics CM Siddaramaiah
Kolhapur Politics : भाजपमध्ये वादाची ठिणगी! संतप्त पदाधिकाऱ्यांनी BJP कार्यालयच केलं बंद; राजकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीत सुरू असलेल्या जी-२० बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित न करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना जी-२० बैठकीला आमंत्रित न करणे चुकीचे आहे. दुष्काळ घोषित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारी याचिका केंद्राकडे सादर केली आहे, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, केंद्र सरकारकडूनही वेळीच मदत यायला हवी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Karnataka Politics CM Siddaramaiah
ठाकरेंनी माझ्याकडं उमेदवारीसाठी दहा कोटींची मागणी केली आणि आदेश बांदेकरांना..; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

खराब गणवेशाची चौकशी

कर्नाटक हातमाग संस्थेने शिक्षण योजनेंतर्गत मुलांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गणवेशाची चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याला संबंधितांना जबाबदार धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपास सुरू असून, संबंधितांकडून भरलेली रक्कम वसूल करण्याची कारवाई केली जाईल.

म्हादई आणि मेकेदाटू प्रकल्प राबविण्यास तयार आहे. केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाची परवानगी घेतलेली नाही. म्हणून, आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटणार आहोत. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा आम्ही पंतप्रधानांना माहिती देऊ. विनंती करु. त्यांनी महादयी प्रकल्पाशी संबंधित सर्व अहवाल केंद्राकडे पाठवले आहेत आणि आवश्यक परवानगीची विनंती केली आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

Karnataka Politics CM Siddaramaiah
Loksabha Election : 'भाजप-धजद युतीची अद्याप वेळ आली नाही'; कुमारस्वामींच्या वक्तव्याने खळबळ, BJP बॅकफूटवर?

पंतप्रधांनाकडून शिष्टमंडळासाठी भेटीची वेळ नाही

म्हादई, कृष्णा आणि कावेरी सिंचन प्रकल्पासंदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेट देण्यासाठी राज्याने केंद्राला लिहिलेल्या पत्राला अद्याप उत्तर मिळालेले नाही. सिंचन प्रकल्पाबाबत राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात पंतप्रधानाना विनंती पत्र लिहिण्यात आले आहे, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Siddaramaiah emotional speech after resignation
why did Siddaramaiah resign
DK Shivakumar next Karnataka Chief Minister
Karnataka Congress leadership change latest news
Marathi News Esakal
www.esakal.com