Karnataka : 'या' उमेदवारांवरुन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये तीव्र मतभेद? सत्ताधारी काँग्रेसमध्ये उफाळणार असंतोष

उमेदवारीवरून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.
DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal
Summary

सीताराम आणि सुधाम दास यांच्या निवडीला विरोध होत असल्याने इच्छुकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बंगळूर : विधान परिषदेवर (Bangalore Vidhan Parishad) नियुक्तीसाठी तीन उमेदवारांची नावं निश्चित करून ती राज्यपालांकडं मंजुरीसाठी पाठविली आहेत. परंतु, काँग्रेसच्या (Congress) काही नेत्यांनी याला जोरदार विरोध केला आहे. या निवडीवरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला असून नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री आणि माजी मंत्री उमाश्री, एम. आर. सीताराम आणि ईडीचे निवृत्त अधिकारी सुधाम दास यांची नावं निश्चित केली आहेत. काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी ही यादी राज्यपालांकडं पाठवली आहे.

DK Shivakumar Siddaramaiah
LokSabha Election : लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले! कोल्हापुरातून 'हे' नेते लढवणार निवडणूक? महाडिकांनी दिले स्पष्ट संकेत

उमाश्री यांना कलाकार कोट्यातून, एम. आर. सीताराम यांना शैक्षणिक कोट्यातून आणि सेवानिवृत्त ईडी अधिकारी सुधाम दास यांना समाजसेवेतील कार्याबद्दल उमेदवारी दिली आहे. सिद्धरामय्या यांनी मंगळवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली.

सीताराम आणि सुधाम दास यांच्या निवडीला विरोध होत असल्याने इच्छुकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे सीताराम आणि सुधाम दास यांच्या उमेदवारीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं राज्यपालांनी सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.

DK Shivakumar Siddaramaiah
Loksabha Election : भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला प्रत्युत्तर देण्यासाठी डीकेंनी आखली मोठी रणनीती; कर्नाटकात जोरदार हालचाली

मात्र, यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष पसरला आहे. विधान परिषदेच्या जागांपासून वंचित राहिलेल्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने काँग्रेसचे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील संकेत इनागी यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठांना संधी दिल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सक्षम, सुशिक्षित, निष्पक्षपाती आणि तरुण राजकारण्यांना विशेष संधी द्यावी. हे असेच चालू राहिल्यास तरुणवर्ग पक्षापासून दूर जाईल, असे ते म्हणाले.

DK Shivakumar Siddaramaiah
Sunil Tatkare : आम्ही सर्वच निवडणुकींना महायुती म्हणून सामोरे जाणार; खासदार तटकरेंची NCP मेळाव्यात मोठी घोषणा

काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला असून उमेदवारी अर्ज सादर करण्यावरून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीला पक्षातील दलित नेते विरोध करत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते एम. आर. सीताराम यांना उमेदवारी दिल्याच्या विरोधात राज्यपालांकडं तक्रार केली आहे. सीताराम यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप असून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com