
महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा डाव, कर्नाटकात साखर कारखाने सुरू
esakal
Sugar Factories Start Karnataka : कर्नाटक सरकारने यावर्षीच्या साखर हंगामात अचानक बदल करताना हंगाम एक नोव्हेंबरऐवजी २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय आज अचानक जाहीर केला. या निर्णयाचा फटका कोल्हापूरसह सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमाभागातील कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. पण, राज्याच्या मंत्री समितीने कर्नाटक सरकारने हंगामाची तारीख लवकर घेतली, तर सीमाभागातील कारखानेही कर्नाटकसोबत सुरू करण्यास परवानगी दिली आहे.