पुलवामा जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

स्थानिक नागरिक दहशतवादी संघटनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. गेल्या दोन दिवसांत काश्मीर खोऱ्यात पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. लष्करेचा कमांडर जुनैद मट्टूला ठार मारण्यात आल्यानंतर लष्करेच्या स्थानिक दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आले आहे.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत लष्करे-तैयबा दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील कोकापुरा भागात बुधवारी रात्रीपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. लष्करे-तैयबा दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

स्थानिक नागरिक दहशतवादी संघटनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. गेल्या दोन दिवसांत काश्मीर खोऱ्यात पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. लष्करेचा कमांडर जुनैद मट्टूला ठार मारण्यात आल्यानंतर लष्करेच्या स्थानिक दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...
'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!
#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​
कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे
वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​
जिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा​

Web Title: Kashmir: 3 Lashkar-e-Taiba terrorists neutralised in encounter