Kashmir Killing: काश्मिरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग! 24 तासांत दुसऱ्या स्थलांतरीत कामगारांची गोळ्या घालून हत्या

रविवारी संध्याकाळी एका पोलीस अधिकाऱ्यावर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता.
goons killed jammu kashmir terrorist commander
goons killed jammu kashmir terrorist commanderEsakal

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात टार्गेट किलिंगच्या घटना घडल्याची नोंद नव्हती पण आता पुन्हा या प्रकारानं डोक वर काढलं आहे. कारण गेल्या चोवीस तासांत दोन स्थलांतरीत कामगारांना दहशतवाद्यांनी आपल्या गोळीनं टार्गेट केलं आहे. त्याचबरोबर एका पोलीस अधिकाऱ्यावरही दहशतवाद्यांनी गोळी चालवली ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. (Kashmir Target killing again Second migrant worker shot dead in 24 hours)

goons killed jammu kashmir terrorist commander
Talangana Election: निवडणूक प्रचारादरम्यान BRSच्या खासदाराला भोसकलं! तेलंगणात घडला थरार

मजुराची गोळ्या घालून हत्या

दक्षिण काश्मिरच्या पुलवामा इथं सोमवारी दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातून रोजंदारीच्या कामासाठी आलेल्या एका मजुराची गोळ्या घालून हत्या केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी रविवारी एका पोलीस इन्स्पेक्टरवर गोळ्या झाडण्यात आल्या, यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

goons killed jammu kashmir terrorist commander
Maratha Reservation: 'पाणी प्या...पाणी प्या' समाजाची हात जोडून आर्त विनंती! जरांगे भावूक, घेणार चार घोट पाणी

डीजीपींनी केली निंदा

सुत्रांच्या माहितीनुसार, मुकेश नामक मजूर हा वीट भट्टीवर काम करुन आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता. सोमवारी दुपारी तो काही वस्तू आणण्यासाठी दुकानात चालला होता. याचवेळी दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना याची कडाडून निंदा केली. त्यांनी म्हटलं की, काही असामाजीक तत्व आहेत त्यांना शांतता आवडत नाही. (Marathi Tajya Batmya)

goons killed jammu kashmir terrorist commander
Maratha Reservation: "मराठा आंदोलन भरकटलंय, जरांगेंनी विचार करावा"; CM शिंदेंचं आवाहन

क्रिकेट खेळताना गोळीबार

दरम्यान, रविवारी संध्याकाळी श्रीनगर शहरातील ईदगाह भागात क्रिकेट खेळत असलेल्या एका पोलीस निरिक्षकावर दहशतवाद्यांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. मसरुर अहमद वानी असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. खेळ सुरु असतानाच गोळीबार झाल्यानं मैदानावर अफरातफरी माजली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com