
केदारनाथमध्ये VIP एंट्री बंद; सर्वसामान्यांप्रमाणे दर्शन मिळणार
उत्तराखंडातील केदारनाथ धामचे (kedarnath news) दरवाजे ६ मे रोजी भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व व्हीआयपी व्यक्तींना आता सर्वसामान्यांप्रमाणेच दर्शन मिळणार आहे. (kedarnath vip darshan) डीजीपी यांनी यासंर्भातील आदेश काढला आहे. गेल्या ६ दिवसांत जवळपास १ लाख ३० हजार लोकांनी दर्शन घेतलं आहे.
या आदेशानुसार सर्व व्हीआयपी लोकांना आता सर्वसामान्य लोकांप्रमाणं दर्शन घेता येणार आहे. यासाठी फक्त दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. याआधी योग्य नियोजनाअभावी २८ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं यंदा प्रशासनानं आता हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने कठोर नियम लागू करत यासाठी नियोजन केलं आहे.
हेही वाचा: काश्मीरमध्ये दोन हत्याचे पडसाद; आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीही लोकांना आवाहन केलं आहे. ज्यांना आरोग्यासंबंधी काही तक्रारी असतील त्यांनी काही दिवसांनी केदारनाथची यात्रा करावी, असं आवाहन केलं आहे. करोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून केदारनाथ यात्रा बंद करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षांनंतर भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.
येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना आता एकाच रांगेतून उभं राहून दर्शन करता येणार आहे. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फक्त दोन तासांचा अवधी मिळणार आहे. यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन न केल्यामुळं अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. याआधीही केदारनाथबरोबरच बद्रीनाथ आणि यमुनोत्रीपरिसरातही नियोजनाचा अभाव दिसून आला होता.
हेही वाचा: जम्मू काश्मीर : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग, 4 जणांचा मृत्यू
Web Title: Kedarnath Temple Darshan On Vip Entry Decision Of Local Authority
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..