उमेदवार निवडीवरून केरळमध्ये वाद

Oman-Chandi-and-Murlidharan
Oman-Chandi-and-Murlidharan

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये येत्या ६ एप्रिलला मतदान होत असताना उमेदवार निवडीवरून घोळ अद्याप कायम असून यादी जाहीर होताच वाद निर्माण होत आहे. येत्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून प्रचाराची दिशा ठरवण्याऐवजी नेत्यांचा वेळ हा उमेदवार निवडीवरून निर्माण झालेला असंतोष दूर करण्यातच खर्ची पडत आहे. यादरम्यान कॉंग्रेसने ८६ उमेदवार जाहीर केले असून केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत के. करुणाकरन यांचे चिरंजीव के. मुरलीधरन यांना मैदानात उतरले आहे. त्याचवेळी ओमन चंडी यांनाही पुथुप्पल्ली येथून तिकीट दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार मुरलीधरन यांना तिरुअनंतपुरम शहरातील नेमोन मतदारसंघातून उभे केले आहे. ही मोठी जोखीम मानली जात आहे. या ठिकाणी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष कुम्मनाम राजशेखरन आणि माकपकडून  तिरुअनंतपुरमचे माजी महापौर व्ही. सिवानकुट्टी उभे आहेत. कॉंग्रेससाठी ही जागा महत्त्वाची असून गेल्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या कॉंग्रेसला केवळ १५ हजार मते पडली होती. त्यामुळेच हायकमांडने नेमोन मतदारसंघात प्रबळ उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. ओमन चंडी यांना नेमोन येथून लढण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, उरलेल्या सहा उमेदवारांची घोषणा आज हायकमांडने केली. वीणा नायर यांना वैत्तियुकायू, पी. सी. विष्णूनाथ यांना कुंडारा, टी. सिद्दीकी यांना कलपट्टा, फिरोज कुनुपरांबील यांना थानुवुर, व्हि. व्हि. प्रकाश यांना निलमबुर मल्लपुरेम आणि रियास मुकोल्ली यांना पटांम्बी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

चंडी, चेन्नीथालांचा उमेदवारी अर्ज दाखल; केरळमध्ये चुरस आणखी वाढली
कोट्टायम/ अलप्पुझा - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी, विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथाला यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. चंडी हे कोट्टायम जिल्ह्यातील पुथूपल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून आज सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांनी पल्लीक्काथोडू येथील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरला. चेन्नीथाला हे अलप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. आज त्यांनी देखील दुपारी १२. १० च्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला. सध्या ओमन चंडी यांचे वय ७७ वर्षे एवढे असून मागील वर्षीच त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. 

चंडी हे पुथूप्पल्ली मतदारसंघातून अकरा वेळा निवडून आले आहेत. कधीकाळी हा मतदारसंघ डाव्यांचा बालेकिल्ला होता.

चेन्नीथालांची कारकीर्द
रमेश चेन्नीथाला ज्या हरिपाद या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत तो काँग्रेसचा बालेकिल्ला नसला तरीसुद्धा त्यांचा येथून एकदाही पराभव झालेला नाही. ते १९८२ पासून याच मतदारसंघातून निवडून येत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या चेन्नीथाला यांनी कोट्टायममधून तीनवेळा तर मावेलिक्कारातून एकावेळेस लोकसभा निवडणूक जिंकली आहे. विधानसभेच्या मैदानात त्यांना यावेळेस भाकपच्या आर. साजीलाल आणि भाजपच्या के. सोमण यांच्याशी दोन हात करावे लागतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com