रेल्वेत महिलेकडे 100 जिलेटिनच्या कांड्या; पोलिसांना सांगितले, कशासाठी आणल्या?

Geletin
Geletin

कोझीकोड - मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीमध्ये स्फोटकं आढळल्याची घटना घडल्यानंतर आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आला. रेल्वेच्या सुरक्षा बलाने ट्रेनमधून 100 हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि 350 डिटोनेटर जप्त केले आहेत. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चेन्नई - मंगलापूरम एक्सप्रेस 02685 मधून स्फोटकं जप्त करण्यात आली. याप्रकरणी अटक करण्यात आलेली महिला तामिळनाडुची असल्याचं सांगितलं जात आहे. महिला ज्या बर्थमधून प्रवास करत होती तिथे स्फोटकं ठेवली होती. महिलेन याबाबत पोलिसांकडे खुलासा करताना म्हटलं की, विहिर खोदण्यासाटी जिलेटिनच्या कांड्या आणल्या होत्या. 

याआधी मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असलेली कार सापडल्यानं खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, मुंबईत मुकेश अंबानींच्या घरापासून काही अंतरावर एक स्कॉर्पिओ आढळली. त्यामध्ये जिलेटिन सापडले आहे. याची चौकशी सध्या मुंबई क्राइम ब्रँच कर आहे. पोलिसांना गुरुवारी सांयकाळी चारच्या सुमारास बेवारस गाडीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर गाडी संबंधित ठिकाणावरून दुसरीकडे नेऊन तपास करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com