Google Map देखील चुकला, केरळी कुटुंब थेट घुसले कालव्याच्या पाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Maps

Google Map देखील चुकला, केरळी कुटुंब थेट घुसले कालव्याच्या पाण्यात

हल्ली आपण पत्ता शोधण्यासाठी स्थानिक माणसांऐवजी Google Maps वर जास्त अवलंबून राहतो. पण कधी कधी हे मॅप्स आपल्याला खूप फिरवून किंवा गल्लीबोळातल्या रस्त्याने घेऊन जातो असा अनेकांचा अनुभव असतो. पण केरळमध्ये तर एका कुटूंबाला चक्क Google Maps ने कॅनलच्या पण्यात नेले. स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.

डॉ. सोनिया, त्यांची आई सोसाम्मा, तीन महिन्यांची मुलगी आणि एक नातेवाईक अनीश हे कारळ मधील कुंबानाडसाठी प्रवास करत होते. त्यांनी पत्ता शोधण्यासाठी Google Maps चा आधार घेऊन प्रवास करत होते. थिरुवथुक्कल नट्टकोम सिमेंट जंक्शन बायपासवर पोहचल्यावर रस्ता चुकला आणि ते थेट पराचल येथील कॅनलच्या पाण्यात खेचले गेल्याच तिथल्या पोलिसांनी सांगितल.

पराचल कॅनलच्या जवळ पोहचल्यावर Google Maps सरळ जाण्याचे निर्देश करत होता. त्यावर विश्वास ठेऊन कोणताही विचार न करता ड्रायव्हरने सरळ गाडी घातली आणि ते पाण्यात पडले. तेथील स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली आहे.

प्रसंगावधान दाखवत स्थानिक लोकांनी कारला दोरी बांधून त्यांना बाहेर काढले. यात कारच्या बोनेटचा भाग पूर्ण पाण्यात गेला होता.