esakal | पदव्युत्तर अभ्यासक्रमात गोळवलकर, सावरकरांचं नाव; पुस्तक जाळत काँग्रेसचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Savarkar

माकप-सीपीआई विद्यापीठात संघ परिवाराचा अजेंडा राबवत आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमात गोळवलकर, सावरकरांचं नाव

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

तिरुअनंतपुरम : केरळमधील (Kerala) कन्नूर विद्यापीठाच्या (Kannur University) पदव्युत्तर अभ्यासक्रमात व्ही. डी. सावरकर (VD Savarkar) आणि एम. एस. गोळवलकर (MS Golwalkar) यांच्या कार्याचा उल्लेख केल्याने खळबळ उडालीय. काँग्रेसची (Congress) विद्यार्थी संघटना आक्रमक झाली असून केरळ स्टुडंट्स युनियननं (Kerala Students Union) गुरुवारी विद्यापीठात रॅली काढून या अभ्यासक्रमाच्या प्रती जाळत निषेध नोंदवला आहे. काँग्रेसनं आरोप केलाय की, सत्ताधारी सीपीआई सरकार भगव्या शिक्षणाला प्राधान्य देत असून महान व्यक्तींचे विचार संपावण्याचा डाव आखत आहे. मात्र, कन्नूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितलं की, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा संपूर्ण वाद सीपीआई प्रशासन आणि राजकारणाच्या अभ्यासक्रमाबाबत आहे. त्यात सावरकरांच्या ‘हिंदुत्व: हू इज अ हिंदू’ आणि गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ आणि ‘वी ऑर ऑवर नेशनहुड डिफाइन्ड’ मधील उतारे समाविष्ट होते. या व्यतिरिक्त, दीनदयाल उपाध्याय यांचे ‘इंटीग्रल ह्युमनिज्म’ आणि बलराज मधोक यांचे ‘इंडियनाइजेशन: व्हाट, व्हाय अॅण्ड हाउ’ यांचाही अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला आहे.

हेही वाचा: योगींच्या राज्यात भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आरोप केलाय, की माकप-सीपीआई विद्यापीठात संघ परिवाराचा अजेंडा राबवत आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रिजील मकुट्टी, म्हणाले की, आरएसएसचे एजंट केरळमधील उच्च शिक्षणावर नियंत्रण ठेवत आहेत. याला आमचा कायम विरोध असेल. पिनराई विजयन सरकारमधील शिक्षणाच्या भगव्याकरणाच्या विरोधात आम्ही विरोध करत राह, असंही त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा: राष्ट्रवादीसह भाजपचा बॅंका, पतसंस्थांवर 'डोळा'

दरम्यान, कन्नूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक गोपीनाथ रवींद्र यांनी भगव्याकरणाचे आरोप फेटाळले आहेत. आम्ही गांधीजी, नेहरू, डाॅ. आंबेडकर आणि टागोर यांच्या कार्याचा देखील समावेश केला आहे. तसेच या अभ्यासक्रमात सावरकर आणि गोळवलकर यांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना या सर्व विचारसरणीच्या महान व्यक्तींबद्दल माहिती व्हावी, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. अभ्यासक्रमात सावरकर आणि गोळवलकर यांच्या कार्याचा गौरव केला, यात गैर काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

loading image
go to top