नॅशनल हायवेवर थांबलेल्या ट्रकला कार धडकून८ इंजिनिअर विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेचा CCTV VIDEO VIRAL

Tamil Nadu Students Accident in Kerala तामिळनाडुच्या विद्यार्थ्यांच्या कारचा केरळमध्ये भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा मृत्यू झाला असून घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांचा अपघाता आधीचाही व्हिडीओ समोर आला आहे.
Tamil Nadu Students Accident in Kerala

Tamil Nadu Students Accident in Kerala

Esakal

Updated on

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या ८ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सर्व विद्यार्थी तामिळनाडुचे होते. राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या एका मालवाहू ट्रकला कारने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार गॅस कटरने कापावी लागली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज आणि विद्यार्थ्यांनी ट्रिपच्या आधी केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com