निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; आता वयाच्या 17 व्या वर्षीही 'मतदान कार्ड'साठी करता येणार अर्ज

देशातील तरुण मतदारांसाठी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय.
Election Commission
Election Commissionesakal
Summary

देशातील तरुण मतदारांसाठी निवडणूक आयोगानं (Election Commission) मोठा निर्णय घेतलाय.

हैदराबाद : देशातील तरुण मतदारांसाठी निवडणूक आयोगानं (Election Commission) मोठा निर्णय घेतलाय. आता 17 वर्षे वयाच्या तरुणांनाही मतदार ओळखपत्र (Voter ID Card) मिळणार आहे. वयाची 17 वर्षे पूर्ण केल्यानंतर, तरुणांना आता मतदान कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.

तरुणाचं वय 18 वर्षे असणं आवश्यक नाहीय. आता 17 वर्षांचे तरुणही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशांनंतर, 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे (Anoop Chandra Pandey) यांनी सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. आता तरुणांना मतदान कार्डसाठी वर्षातून तीनदा आगाऊ अर्ज करता येणार आहे.

Election Commission
Iraq : इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर कब्जा

निवडणूक आयोगाच्या नवीन सूचनेनुसार, तरुणांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरलाही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोग नवीन नोंदणी फॉर्म आणणार आहे. याकरिता तुम्हाला आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. मात्र, आधार कार्डची सक्ती असणार नाहीय. तुम्ही अर्जदार म्हणून स्वेच्छेनेही माहिती देऊ शकता.

Election Commission
Karnataka : कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या; दक्षिण कन्नड जिल्ह्यात कलम 144 लागू

तेलंगणामध्ये 1 ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार

तेलंगणातही (Telangana) मतदार यादीत सुधारणा करण्यात येत आहे. 18 वर्षांचे असलेले लोकही नव्या यादीत समाविष्ट होणार आहेत. या वर्षी मतदार यादी दुरुस्तीमध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरुण मतदारांचाही समावेश असेल. यापूर्वी 1 जानेवारीला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा मतदार यादीत समावेश करण्याची कट ऑफ डेट ठेवण्यात आली होती. तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सर्व जिल्ह्यांच्या डीएमशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून मतदान यादी सुधारण्याबद्दल माहिती देण्यास सांगितलंय. या दुरुस्तीदरम्यान झालेल्या काही चुकाही सुधारल्या जातील.

Election Commission
Arvind Kejriwal : पंजाब पोलिसांनी केजरीवालांना दिली Z+ सुरक्षा; काँग्रेस आमदाराचा दावा

5 जानेवारीपर्यंत अंतिम यादी तयार होणार

या दुरुस्तीची प्रक्रिया 4 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल. परंतु, अंतिम यादी 8 डिसेंबर रोजी येणार असून, त्यात सर्व हरकती दूर केल्या जातील. मतदार यादीतील दुरुस्तीबाबत लोकांना माहिती व्हावी, यासाठी रविवार आणि शनिवार या दोन दिवशी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. सर्व हरकती आणि दाव्यांचा समावेश केल्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम यादी तयार होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com