बुरखा, हिजाब घातलेल्या परदेशी महिलेने केला चाकू हल्ला; कॅब चालक जखमी

Knife attack by a foreign woman
Knife attack by a foreign womanKnife attack by a foreign woman

देशभरात हिजाबवरून (Hijab) वाद सुरू आहे. आशात बुरखा आणि हिजाब घातलेल्या परदेशी महिलेने मंगळवारी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये कॅब चालकावर चाकू हल्ला (Knife attack by a foreign woman) केला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, चौकशी करीत आहेत. ही महिला इजिप्तची नागरिक असल्याचे सांगण्यात येते. रघुराज (रा. बुलंदशहर, उत्तर प्रदेश) असे जखमी कॅब चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुरखा आणि हिजाब (Hijab) परिधान केलेल्या विदेशी महिलेने मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गुरुग्राममधील राजीव चौकात उभ्या असलेले कॅब चालक रघुराज याच्यावर चाकूने हल्ला (Knife attack by a foreign woman) केला. यानंतर ती पळून जाऊ लागली.

Knife attack by a foreign woman
पुलवामा हल्ला म्हणजे बाबरी मशीदचा बदला; काश्मिरी विद्यार्थी ताब्यात

जखमी कॅब चालकाने तिचा पाठलाग केला. त्याचवेळी चौकीजवळ तैनात असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला पकडले. यावेळी महिलेने पोलिसांनाही शिवीगाळ केली. या हल्ल्यामागचे कारण समजू शकलेले नाही. जखमी कॅब चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मी भाड्याने कॅब चालवतो. गुरुग्राम (gurugram) ते दिल्लीच्या आनंद विहारपर्यंत प्रवाशांना घेऊन जातो. मंगळवारी सकाळी राजीव चौकात प्रवाशांची वाट पाहत उभा होतो. दरम्यान, हिजाब (Hijab) घातलेली महिला आली आणि कारची खिडकी उघडली. काच उघडताच महिलेने चाकूने हल्ला (Knife attack by a foreign woman) केला. त्यानंतर महिला सिव्हिल लाइनच्या दिशेने धावू लागली. तिचा पाठलाग करीत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, चौकशी करीत आहेत, असे रघुराजने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com