esakal | पूल तृणमूलचा; जाहिरात भाजपची; ट्विट गाजतेय काँग्रेसच्या प्रियांकांचे
sakal

बोलून बातमी शोधा

पूल तृणमूलचा; जाहिरात भाजपची; ट्विट गाजतेय काँग्रेसच्या प्रियांकांचे

पूल तृणमूलचा; जाहिरात भाजपची; ट्विट गाजतेय काँग्रेसच्या प्रियांकांचे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहिरातीमध्ये तृणमूल काँग्रेसने बांधलेल्या पुलाचे छायाचित्र झळकल्याचा वाद थांबायला तयार नाही.

हेही वाचा: योगींच्या 'अब्बा जान'च्या वक्तव्यावर काँग्रेसनं दिलं प्रत्युत्तर

हेही वाचा: भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

यासंदर्भात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केलेले ट्विट गाजत आहे. त्यांनी हिंदीत ट्विट केले आहे. भाजपला लक्ष्य करीत त्यांनी म्हटले आहे की, खोट्या जाहिराती देणे हेच त्यांचे काम आहे. बोगस लेखापाल बनवून त्यांनी उत्तर प्रदेशच्या युवकांना रोजगार देण्याचा खोटेपणा केला. आता उड्डाणपूल आणि कारखान्यांची चुकीची व बोगस छायाचित्रे दाखवून विकासाचे खोटे दावे केले जात आहेत. ह्यांना ना जनतेचे प्रश्न समजतात ना त्याच्याशी काही देणेघेणे आहे...हे फक्त खोट्या जाहिरातींचे आणि हवेतील दाव्यांचे सरकार आहे.

हेही वाचा: साकीनाका प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर

प्रियांका यांच्या काँग्रेसने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाशी युती केली होती. अशावेळी भाजपवर टीका करण्यासाठी त्यांनी तृणमूलच्या पथ्यावर पडलेल्या विषयाचा आधार घेणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

loading image
go to top