

Kumari Kandam Island : समुद्राची पातळी वाढून जगातील अनेक शहरं बुडाल्याच्या बातम्या येत असतात. यामागे ग्लोबल वॉर्मिंगचं कारण सांगितलं जातं आणि या कारणामुळे अनेक विध्वंसक बदल होत असल्याचं जगाने अनुभवलंय. प्राचीन काळापासूनही हे घडत आलंय. ग्रीक सभ्यतेतील महान तत्त्वज्ञ प्लेटोने देखील म्हटलं होतं की, अंटार्क्टिकाच्या खाली काही शहरं होती जी आज बर्फात गाडली गेली आहेत. एवढंच नाही तर भारताचा खूप मोठा भाग समुद्राने गिळंकृत केलाय.
मानव सभ्यता पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून तिने अनेक मोठमोठे विनाश पाहिले. यात अनेक प्रजाती नामशेष झाल्या आणि अनेक नवीन प्रजातीही जन्माला आल्या. जगातील सर्व धर्मग्रंथांमध्ये महाविनाशचा उल्लेख आहे आणि एवढंच नाही तर वैज्ञानिकही याची पुष्टी करतात. प्राचीन जमातींमध्येही महापूर आल्याचे उल्लेख आढळतात. त्याचप्रमाणे तमिळ साहित्यात कुमारी कंदम या भारतातील जलमग्न भूमीचा उल्लेख आहे. शास्त्रज्ञांच्या मते, गोंडवाना नावाचे बेट तुटल्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका तयार झाले.
19 व्या शतकात आफ्रिका, भारत आणि मादागास्कर यांच्यातील भूवैज्ञानिक समानता शोधण्यासाठी अमेरिकन आणि युरोपियन विद्वानांच्या गटाने एक खंड बुडल्याचा अंदाज लावला. याला लेमुरिया असं नाव दिलं गेलं. या शोधात आणखी एक बेट सापडलं ज्याला मु (Mu) हे नाव देण्यात आलं. हिमयुग वितळल्यानंतर त्याचं पाणी समुद्रात गेल्यावर त्याची पातळी इतकी वाढली की त्यामुळे लेमुरिया आणि मु नावाची दोन्ही बेटं पाण्यात बुडाली. या दोन्ही खंडांवर मानवी सभ्यता विकसित झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
कुमारी कंदम हे दक्षिण भारतात होतं
तमिळ इतिहासकारांच्या मते या बेटाचं नाव कुमारी कंदम असं होतं. यासह त्यांना कुमारी कांतम आणि कुमारी नाडू अशी इतरही नावं होती. आजच्या भारताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात हा भाग पाण्याखाली गेल्याचं सांगितलं जातं. तामिळ संशोधक आणि विद्वानांनी समुद्रात हरवलेल्या त्या भूमीचा संबंध तामिळ आणि संस्कृतच्या आधारे पांड्य महापुरुषाशी जोडला आहे. या लुप्त झालेल्या सभ्यतेचं वर्णन दक्षिण भारतातील लोकगीतांमध्येही आढळते.
कुमारी कंदमची माहिती देणारे संशोधक जेव्हा भारतीयांना भेटले तेव्हा या लोकगीतांना आणि कथांना बळ मिळालं. पूर्वी ही लोकगीते आणि कथा काल्पनिक मानल्या जात होत्या. आफ्रिकेत मानवी संस्कृतीची भरभराट झाली असं काहींचं मत असलं तरी काहींच्या मते कुमारी कंदम या भारतातील लुप्त झालेल्या बेटावर त्याची सुरुवात झाली. एक्सप्लोरर फिलिप कोल्टन यांनी कुमारी कंदमवर अतिशय बारकाईने संशोधन केलं आणि त्यांनी भारत आणि मादागास्करमध्ये मोठ्या प्रमाणात वानरांचे जीवाश्म सापडले. त्यांनी येथील नवीन सभ्यतेच्या अस्तित्वाबद्दल सांगितलं. 1864 मध्ये त्यांनी याबाबत एक पुस्तकही लिहिलं.
आजच्या भारतापेक्षा 3-4 पट मोठं बेट
कुमारी कंदमचं क्षेत्र उत्तरेला कन्याकुमारीपासून पश्चिमेला ऑस्ट्रेलिया आणि पूर्वेला मादागास्करपर्यंत पसरलं होतं. अशा स्थितीत तो आजच्या भारतापेक्षा 3-4 पट मोठा असल्याचा अंदाज आहे. भारताने यावर संशोधनही केलं असून, 14 हजार 500 वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या तुलनेत 100 मीटर खाली होती आणि 10 हजार वर्षांपूर्वी ती 60 मीटर खाली होती असा अंदाज लावण्यात आला आहे.
त्यामुळेच श्रीलंकेला जोडणारा दगडी इथे पूल असण्याची शक्यता आहे. पण हळूहळू पाण्याची पातळी वाढली आणि हा पूलही समुद्रात बुडाला. गेल्या 15 हजार वर्षांत समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पूर आला आणि हे दोन खंड आणि पूलही पाण्याखाली गेले.
एक्सप्लोरर कोल्टन यांनी असंही सांगितलंय की लेमुरिया बेटावरील लोक खूप उंच होते. त्यांची उत्पत्ती 1 लाख वर्षांपूर्वी झाली असावी आणि तो हिमयुगाचा काळ होता. हिमयुगाबद्दल असं सांगितलं जातं की, हिमयुग नष्ट होत असताना अनेक जमाती नामशेष झाल्या. हिमयुग जसंजसं संपुष्टात येऊ लागलं तसतसं त्याचं पाणी समुद्रात येऊ लागलं, त्यानंतर पाण्याची पातळी खूप वाढली आणि कुमारी कंदम बेट समुद्राने गिळंकृत केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.