सीता के पती...; कुणाल कामराने जंतर-मंतरवर केलेल्या विधानाने नवा वाद, अभिजीत दीपकेवरही होतेय टीका

Kunal Kamra controversy: जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कॉमेडियन कुणाल कामरा बुधवारी गेला होता. त्यावेळी त्याने केंद्र सरकारवर टीका करताना केलेल्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे.
Kunal Kamra controversy

Kunal Kamra controversy

Esakal

Updated on

CJP Protest: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली असली तरी ते उपोषणावर ठाम आहेत. जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनस्थळी कॉमेडियन कुणाल कामराने भेट दिली. यावेळी कामराने केलेल्या विधानाने आता नवा वाद निर्माण झालाय. कामराने हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. तर कामराच्या विधानानंतर अभिजीत दीपके टाळ्या वाजवत असल्याचं दिसल्यानंतर त्याच्यावरही टीका केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com