आशिष मिश्रांच्या जामिनाविरोधात पीडित शेतकऱ्यांचे कुटुंबिय सुप्रीम कोर्टात

लखीमपूर इथं निषेध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आशिष मिश्रांच्या ताफ्यानं चिरडलं होतं.
Lakhimpur Kheri Case
Lakhimpur Kheri Caseesakal

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रमुख आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आशिष मिश्रा हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचे पुत्र आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या या हिंसाचारामुळं देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. (Lakhimpur Kheri Family of victim farmers in SC against Ashish Mishra bail)

Lakhimpur Kheri Case
कर्नाटकात ‘विहिंप’च्या कार्यकर्त्याची हत्या; हिजाब वादाशी संबंध?

१० फेब्रुवारी रोजी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठानं आशिष मिश्रा यांना जामिन मंजूर केला होता. गेल्या चार महिन्यांपासून मिश्रा हे तुरुंगात होते. गेल्या आठवड्यात अॅड. सी. एम. पांडा आणि शिवकुमार त्रिपाठी यांनची सुप्रीम कोर्टात आशिष मिश्रा यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर इतरही दोन वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केली होती.

Lakhimpur Kheri Case
लालू प्रसाद यादवांना दणका! पाच वर्षांचा कारावास, 60 लाखांचा दंड

गेल्यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखिमपूर खिरी इथं शेतकऱ्यांचं निषेध आंदोलन सुरु असताना आशिष मिश्रा यांच्या वाहनाच्या ताफ्यानं आठ लोकांना चिरडलं होतं. ज्यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. यावेळी चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मारहाणही केली होती. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com