Latest Marathi News Update: दिल्ली भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी

नव्या ‘हिट अँड रन कायद्या’विरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे देशाच्या आठ राज्यांत तीव्र पडसाद उमटले आहेत.
LIVE Marathi News Updates
LIVE Marathi News UpdatesEsakal

BJP Yuva Morcha: दिल्ली भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी

दिल्ली भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शशी यादव यांची पक्षविरोधी कारवायांसाठी तत्काळ पक्षातून हकालपट्टी

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये कारचे नियंत्रण सुटले; तीन जण ठार, पाच जखमी

आंध्र प्रदेशमध्ये देवरापल्ली मंडलमधील बांदापुरम उड्डाणपुलाजवळ एका कारचे नियंत्रण सुटल्याने तीन जण ठार आणि पाच जखमी झाले.

Hindenburg: हिंडेनबर्गच्या आरोपांवर निरीक्षण करण्याच्या मागणीवर उद्या निकाल

अदानी समुहाच्या कंपन्यांविरुद्ध शेअर बाजारातील उल्लंघनाबाबत यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने केलेल्या आरोपांवर न्यायालयाचे निरीक्षण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे.

राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

कोल्हापुरातील कसबा-बावडा परिसरात राजाराम साखर कारखान्याच्या संचालकांला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामुळं सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

तीन नवे फौजदारी कायदे २६ जानेवारीपूर्वी नोटिफाय होणार 

केंद्र सरकारनं इंग्रजांच्या काळातील IPC, CrPC आणि Evidence Act हे तीन फौजदारी कायद्यांमध्ये बदल करुन नवे कायदे आणले आहेत. हे कायदे २६ जानेवारीपूर्वी नोटिफाय करण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच ते देशभरात लागू होतील.

सुनील केदार यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव; उद्या सुनावणीची शक्यता

सुनील केदार यांची जामीन आणि शिक्षेवरील स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव. या प्रकरणावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता.

उपसमितीच्या बैठकीला जरांगे व्हिसीद्वारे उपस्थिती लावणार

मराठा आरक्षण व सुविधा उपसमिती बैठकीला मनोज जरांगे ऑनलाईन उपस्थित राहणार. आज सह्याद्री गेस्ट हाऊसवर ही बैठक होणार असून जरांगे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री समितीचा आत्तापर्यंतचा आढावा त्यांच्यासमोर ठेवणार आहेत. जरांगेंनी मुंबईकडं जाऊन आंदोलनाचा निर्णय घेतला आहे तो मागं घेण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत.

राम मंदिराच्या उद्घाटनाचं थेट प्रक्षेपण होणार

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं अनेक शहरांमध्ये थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. याबाबत भाजपची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत विचार सुरु असल्याची माहिती आहे.

यवतमाळमध्ये २७ पेट्रोल पंप झाले ड्राय

यवतमाळ शहर तसेच लगत परिसरात जवळपास 30 पेट्रोल पंप आहेत. याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळं दुपारनंतर जवळपास 27 पेट्रोल पंप ड्राय झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद नाहीत 

कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद नाहीत ते सुरळीत सुरू आहेत. पण ट्रक वाहतूकदारांचा संप सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण दहा हजारांहून अधिक ट्रक चालक-मालक संपात सहभागी झाले आहेत. कोल्हापुरातून ट्रकद्वारे बाहेरच्या राज्यात होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळं दोन दिवसात अंदाजे दहा कोटी रुपयांहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. वाहतूकदार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. उद्यापासून भाजीपाला वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता.

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आजपासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह

श्री मलंगगड हरिनाम महोत्सवाची सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पडला. तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत. या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी अतिशय सुंदर असे अश्व रिंगण पार पडले. या रिंगण सोहळ्यात थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले होते. या रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडी वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली, यावेळेसचे क्षण... !!

Gowandi: गोवंडीच्या झाकीर हुसेन नगरमध्ये कंपनीत स्फोट

Gowandi Fire Accident: गोवंडीच्या झाकीर हुसेन नगरमध्ये भीषण आग लागली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , बॅग बनवणाऱ्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

मनमाडमध्ये टँकर चालक-मालकांचा संप मागे

मनमाडमध्ये टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आला आहे. टँकरमध्ये इंधन भरण्यास मालकांनी परवानगी दिली आहे.

Bharat Petrolium: भारत पेट्रोलियमच्या डेपोबाहेर कडेकोट बंदोबस्त!

नागपूर जिल्ह्यातील भारत पेट्रोलीयमच्या डेपोतून डिझेल आणि पेट्रोलचे टँकर नागपूरला आणले जाणार आहेत. नागपूर शहरात पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या टॅंकर्सच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

जपानमध्ये विमानाला लागली भीषण आग, विमान जळून खाक

जपानमधील टोकियो हानेडा विमानतळाच्या रनवेवर उभ्या असलेल्या विमानाला आग लागली. भारतीय वेळेनुसार ही दुर्घटना दुपारी अडीच वाजता घडली. ही भीषण आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Shasan Aplya Dari:शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा

रायगडमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

शेट्टी-ठाकरेंच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

नुकतीच राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीवर संजय राऊत यांनी वक्तव्य केलय. ते म्हणाले की, 'राजू शेट्टी हे त्यांचा स्वतंत्र्य पक्ष चालवतात.'

मनमाडमध्ये टँकर मालकांनी संप घेतला मागे

मनमाडमध्ये टँकर मालकांनी संप घेतला मागे घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची चर्चा अंतिम टप्प्यात

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेस घटक पक्षांना सोबत घेताना मोठा भाऊ म्हणून काही राज्यात समजुतदार पणाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपसोबत जागावाटप केलं जाणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीसोबत जागावाटप केलं जाणार आहे.

झारखंड हेमंत सोरेन, तामिळनाडूमध्ये स्टॅलिनसोबत, बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत तर केरळमध्ये डाव्यांसोबत काँग्रेस जागावाटपाबाबत जुळवून घेण्याची शक्यता आहे.लोकसभेला भाजपसमोर एकास एक उमेदवार देण्यावर इंडिया आघाडीचा भर असणार आहे. त्यासाठी काही जागा कमी मिळाल्या तरी काँग्रेस समजूतदार पणाची भुमिका घेण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी मातोश्रीवर दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

Raju Shetty: राजू शेट्टी थोड्याच वेळात घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Raju Shetty Meeting with Uddhav Thackrey: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ट्रक चालक संपावर

अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ट्रक चालक संपावर आहेत. अमरावती येथील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. नवसारी चौकास ट्रक चालकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक, मनोज जरांगेंनाही निमंत्रण

आज मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपुर्ण बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ४ वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मनोज जरांगे यांना देखील उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र, आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूर शहरातील २५ टक्के पेट्रोल पंप बंद

नागपूर शहरातील २५ टक्के पेट्रोल पंप बंद आहेत. पेट्रोल पंप ड्राय, वाडी रोड, नंदनवन, मेडिकल चौक, अजनी येथील पेट्रोल पंप बंद आहेत.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ आणि कुटुंबीयांना आजही दिलासा नाहीच

छगन भुजबळ आणि कुटुंबीयांना आजही दिलासा मिळालेला नाहीये. भुजबळ कुटुंबीयांना उच्च न्यायालयाने आयकर विभागाने बेनामी अपसंपदा संदर्भात केलेल्या ४ तक्रारी रद्द केल्या आहेत. या 4 तक्रारींवर स्पेशल कोर्ट आज शिक्कामोर्तब करणार होतं. तक्रारदार आयकर विभाग उपायुक्त डॉ पूजा गॅब्रियल कोर्टात हजर होत्या. मात्र,भुजबळ कुटुंब कोर्टात गैरहजर राहिले आहेत.

Maharashtra Politics: बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभेसाठी पक्ष तयारीला लागले आहे.

वाहतूकदारांच्या संपाबाबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा- केसरकर

वाहतूकदारांच्या संपाबाबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. स्कूल बस चालवणाऱ्यांनी संपात सहभाग घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले आहेत.

प्रोफेसर वेद प्रकाश नंदा यांचे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

प्रोफेसर वेद प्रकाश नंदा यांचे निधन झाले आहे. साहित्य आणि शिक्षा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मभूषण देण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

देशातील जीएसटी संकलनात पुन्हा एकदा वाढ

वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढले आहे.14.97 लाख कोटी रुपये GST संकलन झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.65 लाख कोटी रुपये झाले. डिसेंबरमध्ये सलग नवव्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झालीये. 2023 मधील 10 महिन्यांसाठी जीएसटी संकलनाच्या आकड्यानं 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला.

वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्यात सुरु असलेल्या ट्रक चालकांच्या संपाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीये

-संप सुरू असल्यामुळे कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची मुख्यमंत्र्यांची सर्व जिल्हाधिकारी यांना सुचना

-वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील निर्माण झालेली परिस्थितीची सर्व माहिती केंद्राला दिली जाणार

-केंद्र सरकारचा कायदा असल्यामुळे राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही मात्र संपामुळे होणाऱ्या परिस्थितीची सर्व माहिती केंद्राला दिली जाणार

-नव्या कायद्यामध्ये दहा वर्षांची शिक्षा तरतूद केल्यामुळे वाहतूकदारांचा संप सुरू आहे

-या संपामुळे इंधनाचा तुटवडा झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा कोलमडून पडण्याची शक्यता

संपामुळे निर्माण झालेली स्थिती केंद्राला कळवणार

वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. राज्यातील स्थिती केंद्राला कळवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

भंडाऱ्यातील वरठीमध्ये सनफ्लॅग कारखान्यात स्फोट; 8 जण जखमी

भंडाऱ्यातील वरठीमध्ये सनफ्लॅग कारखान्यातील फर्नेसमध्ये स्फोट झाला आहे. यात ७ ते ८ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Maharashtra News: जागावाटपावरुन आमच्यात कोणताही वाद नाही; संजय राऊत

जागावाटपावरुन महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. मविआत उत्तम संवाद सुरु आहे. लवकरत जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट होईल, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात आज महत्त्वाची बैठक; पुरस्काराच्या रक्कमेबाबतही होणार चर्चा

आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यंदाच्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या मानकऱ्याच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही बैठक बोलवली आहे.

यंदा महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रक्कमेच अडीच पटीने वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यास १० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपये रक्कम देण्यात येणार आहे,

पुढील वर्षी पुरस्काराच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ करण्यावर चर्चा होणार. तर ५० लाख रुपये रक्कम देण्याबाबत आज चर्चा होईल.

श्रीनगरमध्ये उणे ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; दल सरोवर गारठलं

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये काल रात्री उणे ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यामुळे दल सरोवराच्या वरच्या थरावर बर्फाची पातळ चादर तयार झाली आहे.

बस-ट्रक चालकांचा संप, वाहतूक व्यवस्था ठप्प

केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरु आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातील तीव्र विरोध बस-ट्रक चालकांनी केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. अनेक भागात याचा परिणाम दिसून येत आहे

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये पेट्रोल-डिझेल डेपो मधून वाहतूक सुरळीत सुरू

पुणे - पुण्यातील लोणी काळभोर पेट्रोल-डिझेल डेपो मधून वाहतूक व्यवस्थित सुरू झाली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतुक सुरू आहे. वाहतूकदार संपाचा परिणाम डेपोवर नाही पेट्रोल डिझेल टँकर भरून बाहेर पडत आहेत.

आज पासून इलेक्टोरल बॉण्ड्स च्या विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली - आज पासून इलेक्टोरल बॉण्ड्स च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील 29 शाखांमध्ये आजपासून 11 जानेवारी पर्यंत इलेक्ट्रॉरल बॉण्ड्स ची विक्री सुरू राहणार आहे.

मुंबईतील हॉर्नीमन सर्कल येथील SBI च्या शाखेत निवडणूक रोख्यांची विक्री होईल. निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि सार्वत्रिक निवडणुकीत कमीत कमी १ टक्के मत मिळवलेले राजकीय पक्ष निवडणूक रोख्यांच्या योजनेसाठी पात्र ठरतील तसेच खरेदी केल्यानंतर १५ दिवस इलेक्टोरल बॉण्ड्स वैध असतील.

धुक्यामुळे दिल्ली परिसरात २६ ट्रेन उशिराने

राज्यात आणि देशात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे अनेक परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. यादरम्यान धुक्यामुळे दिल्ली परिसरात २६ ट्रेन उशिराने धावत आहेत अशी माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.


पेट्रोल, डिझेलचा पुरवठा आज सुरळीत राहणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने ‘हिट अँड रन’ या ट्रकचालकांसाठी नव्याने केलेल्या कायद्याच्या निषेधार्थ ट्रकचालकांनी पुकारलेल्या आंदोलनातून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी तात्पुरती माघार घेतली. त्यामुळे आजपासून शहरातील इंधनपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्त्वात राजाराम कारखान्यावर आज मोर्चा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्यात ऊस तोडणीबाबत होत असलेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आज (ता. २) प्रादेशिक साखर सहंसाचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील हा मोर्चा सकाळी ११ वाजता बाजार समिती आवारातील विठ्ठल मंदिर परिसरातून निघणार आहे.

नागपूरच्या कोंढाळी भागात ८ ते १० दुकांना भीषण आग; लाखो रुपयांचं नुकसान

नागपूरच्या कोंढाळी भागात रात्री दोनच्या सुमारास ८ ते १० दुकांना भीषण आग लागली आहे. यात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दुर्घटनेत कोणताही जीवितहानी झाली नाही. सध्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आज 62 वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस

आज 62 वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस आहे. मुंबईतील एसआरपीएफ कॅम्पमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

जयंत पाटलांनी घेतली जयश्रीताईंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांची भेट घेतली. मदनभाऊंच्या ‘विजय’ बंगल्यावर चहापान केले. ही केवळ सदिच्छा भेट होती, राजकीय चर्चा काहीच नव्हती, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी जयश्रीताईंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जयंतरावांच्या या चहापानाची चर्चा रंगली आहे.

LIVE Marathi News Updates
जयंत पाटील, प्रतीक पाटील की सुमनताई? 'या' मतदारसंघांतून कोणाला मिळणार उमेदवारी? कार्यकर्त्यांच्या मागणीने चर्चांना उधाण

पुढील दोन दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : पुढील दोन दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच ५ ते ११ जानेवारी दरम्यान मध्य भारतात काही भागांमध्ये थंडीची लाट येऊ शकते, असाही इशारा त्यांनी दिला आहे. यामध्ये विशेषत: मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिणेकडील उत्तर प्रदेशच्या भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूर पुन्हा पेटलं

मणिपूर : मणिपूरच्या लेंगोल पहाडी भागात गोळ्या घालून तिघांची हत्या करण्यात आली आहे, तर ११ पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. जबरदस्तीने वसुली करण्यासाठी हल्लेखोर लिलोंग चिंगजाओ भागात आले होते, पण स्थानिकांनी त्यांना तिथून हाकलून बाहेर काढलं. त्यावेळी तिथून जाताना हल्लेखोरांनी गोळीबार केला, त्यात तिघांचा मृत्यू झाला. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात सरकारने कर्फ्यू लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

सालपे घाटात ट्रॉली उलटली

लोणंद/फलटण : लोणंद- सातारा रस्त्यावर सालपे घाटामध्ये मालवाहू ट्रक व उसाच्या कांड्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात उसाच्या कांड्याने भरलेली ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली. त्‍यामुळे सालपे घाटात दुतर्फा दोन ते अडीच किलोमीटरच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. लोणंद पोलिसांनी तत्परतेने हालचाल करून जेसीबीच्या साहाय्‍याने ट्रक व एक ट्रॉली बाजूला हटविल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली.

टेंपो झाडाला धडकून शिबेवाडीतील चालक ठार

ढेबेवाडी : टेंपो रस्त्याशेजारील झाडाला धडकून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. ढेबेवाडी- कऱ्हाड रस्त्यावर साईकडे फाटा- यादव मळ्यादरम्यान काल रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. उमेश लक्ष्मण शिंदे (वय ४४, रा. शिबेवाडी- कुंभारगाव, ता. पाटण) असे मृत चालकाचे नाव आहे. येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

'हिट अँड रन कायद्या'विरोधात ट्रकचालकांचं आंदोलन तीव्र

Latest Marathi News Live Update : नव्या ‘हिट अँड रन कायद्या’विरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे देशाच्या आठ राज्यांत तीव्र पडसाद उमटले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब अन् गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव जावताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नाशिक, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी आंदोलन केले. आजही हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या बैठका सुरु आहेत.

तसेच राज्यात मराठा-धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरही अद्याप तोडगा नाही. त्याचबरोबर देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com