Latest Marathi News Update : मोहन यादव सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार ते राज्यात कोरोना वाढतोय, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....

दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट तुम्ही येथे वाचू शकता
LIVE Marathi News Updates
LIVE Marathi News UpdatesEsakal

मोहन यादव सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, "उद्या दुपारी 3:30 वाजता मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार होईल."

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल अन् नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा सुकमा सीमा भागातील तुमकपाल आणि डब्बा कुन्ना गावादरम्यानच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तसेच नक्षलवाद्यांशी संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले: पोलीस

दिल्लीत गोदामाला भीषण आग

दिल्लीतील एका गोदामाला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

क्रीडा समारोहासाठी अमित शाहांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील साबरमती रेल्वे मैदानावरील खासदार क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला.

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती येत आहे. कोरोनाच्या नवीन व्हायरसमुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच राज्यातल्या एका महत्त्वाच्या मंत्र्याला कोरोनाने घेरले आहे.

मुंबईतील चुनाभट्टी परिसरात गोळीबार, तिघे जखमी

मुंबईमध्ये गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सावंतांच्या स्वीय सहाय्यकाच्या गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

'वतन को जानो' या अभियानाअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी 250 विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी जयपूर, अजमेर, दिल्लीसह देशातील विविध ठिकाणांना भेट दिली आहे.

अद्याप ऑन पेपर काहीही पाहिलं नाही; साक्षी मलिकची प्रतिक्रिया

कुस्ती परिषदेची मान्यता रद्द होण्याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे. "मी अद्याप लेखी ऑर्डर पाहिलेली नाही. केवळ संजय सिंग यांना निलंबित केलं आहे, की संपूर्ण परिषदेला याबाबत अद्याप स्पष्टता नाही" असं साक्षी मलिकने म्हटलं आहे.

मराठा सर्वेक्षण करताना टर्म्स ऑफ रेफर्न्ससमध्ये बदल होण्याची शक्यता

मराठा सर्वेक्षण करताना टर्म्स ऑफ रेफर्न्ससमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मागासवर्ग आयोगाची २७ तारखेला पुण्यात बैठक होणार आहे. यावेळी मागास ठरवण्याबाबतच्या निकषांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे.

२८ डिसेंबरला स्थापना दिनानिमित्त नागपूरात काँग्रेसची भव्य रॅली

२८ डिसेंबरला स्थापना दिनानिमित्त नागपूरात काँग्रेसची भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरेदी इत्यादी नेते येणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीये.

राम मंदिराच्या कार्यक्रमात मराठा आंदोलनामुळे अडथळा येणार नाही!

राम मंदिराच्या कार्यक्रमात मराठा आंदोलनामुळे अडथळा येणार नाही, असं विरेंद्र पवार म्हणाले आहेत. आम्ही २० तारखेला मुंबईत आंदोलन करणार आहोत. पण, कोणालाही याचा त्रास होऊ देणार नाही. आम्ही रक्षण करणारे आहोत, त्रास देणारे नाही, असंही ते म्हणाले.

Accident News: भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी, सोलापूरमधील घटना

सोलापूरमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून जात असताना दोन मित्रांचा भीषण अपघाताचा मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि ट्रॉलीची जोरदार धडक झाल्याने यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक तरुण गंभीर जखमी आहे.

काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती परिक्षेत फेलोशिप परिक्षेत गोंधळ

बार्टी, सारथी, महाज्योती परिक्षेत फेलोशिप परिक्षेत गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मधील पेपर २०२३ला घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक- देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. शिंदे समितीने दोन अहवाल दिले आहेत. तिसरा अहवालही लवकरच प्राप्त होईल. ओबीसी समाजावर सरकार अन्याय होऊ देणार नाही. आमचं काम पाहून मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय घेऊ नये असं देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये बिल्डिंगला आग! २ घरांसह २० दुचाकी आगीत राख

पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागातील एका वसाहतीमध्ये भीषण आग लागली. रविवारी मध्यरात्री ही आग लागली. या भीषण आगीत दोन घरे आणि जवळपास 20 दुचाकी वाहने पुर्णपणे जळून खाक झाल्याचे वृत्त आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द

नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

हार्दिक पांड्या IPL खेळणार ?

भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि नुकताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालेला हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे अफगाणिस्तान आणि आयपीएल दौऱ्याला देखील मुकणार असल्याचे वृत्त आलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहतूक संथ गतीने

सलग ३ सुट्ट्या असल्यामुळे एक्स्प्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. आजही मुंबई पुणे महामार्गावर वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंकडून वरळी नाका येथे स्वत:च्या हाताने स्वच्छता; पाहा व्हिडिओ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईच्या वरळी नाका येथे डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी स्वत: यावेळी स्वच्छता केली.

मध्य रेल्वे आणि हार्बरवर आज मेगाब्लॉक

आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. वाशी ते पनवेलदरम्यान रेल्वेसेवा बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये माजी पोलिस अधिकाऱ्यावर दहशतवाद्याचा हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यावर एका दहशतवाद्याने गोळीबार केला आहे. मशिदमध्ये अझान प्रार्थना करताना हा हल्ला झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शरद पवारांनी मानले गौतम अदानींचे आभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले आहेत. बारामतीमध्ये टेकनॉलोजी सेंटर उभे करण्यासाठी आर्थिक मदत केल्यामुळे त्यांनी अदानींचे आभार मानले.

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई महामार्ग वाहतूक मंद; सलग सुट्ट्यांमुळे लोकांची गर्दी

सलग सुट्ट्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक मंद गतीने सुरु आहे. गाड्यांच्या रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे. १५ मिनिटाच्या प्रवासासाठी ४५ मिनिटांचा वेळ लागत आहे.

डीप क्लिनिंग ड्राईव्हसाठी मुख्यमंत्री वरळीत

डीप क्लिनिंग ड्राईव्हसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीत आले आहेत. स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सकाळी-सकाळी अनेक भागांची पाहणी करत आहेत.

ईशान्येकडील राज्यांत गारपीट होण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

LIVE Marathi News Updates
Weather Update Today: दिल्लीत पुन्हा घसरणार पारा, 'या' राज्यांमध्ये गारांच्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

कोल्हापुरातील फुटबॉल सामन्यात अतिउत्साही तरुणांची हुल्लडबाजी

कोल्हापूर : येथील शाहू मैदानावर रंगलेल्या श्री शिवाजी तरुण मंडळ विरुध्द पाटाकडील तालीम ‘अ’ या संघांतील अटीतटीच्या सामन्यात अतिउत्साही व हुल्लडबाज समर्थकांनी दगड, बाटल्यांसह चपला मैदानावर भिरकावल्या. या प्रकाराने मैदानावर गोंधळ व तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला.

महाबळेश्‍‍वरमध्‍ये थंडीचा कडाका वाढला

महाबळेश्वर : महाराष्ट्रातील थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाबी थंडीच्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी (Mahabaleshwar Tourism) सध्या थंडीचा (Winter Season) कडाका चांगलाच वाढला आहे. शहरात सध्या १२ अंश, तर वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात सात ते आठ अंशापर्यंत पारा खाली जात असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

LIVE Marathi News Updates
Mahabaleshwar Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला! 'मिनी काश्मीर' महाबळेश्वर थंडीनं गारठलं

अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियामध्ये हिंदू मंदिराची तोडफोड करून भारतविरोधी भित्तिचित्रे काढण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात असल्याची माहिती देण्यात आली. कॅलिफोर्नियातील नेवार्क शहरातील स्वामिनारायण मंदिराची शुक्रवारी साधारणपणे काल सकाळी साडेआठच्या सुमारास तोडफोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री केजरीवालांना तिसऱ्यांदा ED ची नोटीस

नवी दिल्ली ः दिल्लीतील तथाकथित उत्पादन शुल्क (मद्य धोरण) घोटाळ्याच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज पुन्हा नोटीस बजावली आहे. यापूर्वीच्या दोन नोटीसीला दाद न देता ते ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत.

खंबाटकी घाटात आठ तास वाहतूक ठप्‍प

खंडाळा : पुणे- बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील पाचव्‍या वळणावर काल (शनिवार) सकाळी आठच्‍या सुमारास दोन ट्रक बंद पडल्‍याने आणि सलगच्‍या सुट्यांमुळे वाहनांची संख्‍या वाढल्‍याने सातारा, महाबळेश्‍‍वरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्‍प झाली. पोलिसांच्‍या प्रयत्‍नानंतर सायंकाळी चारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

मराठ्यांचं वादळ 20 जानेवारीला मुंबईत धडकणार; जरांगेंची आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा केलीये. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून उपोषण यात्रेला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितलंय. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केंद्र सरकार यावर लक्ष ठेवून आहे. तसेच देश व राज्यातील हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा सुरु असून काही मुद्द्यांना विरोध होताना दिसत आहे. लोकसभेसाठी 'मविआ'चा जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून शरद पवार व राहुल गांधी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे.

तसेच दिल्लीतील तथाकथित उत्पादन शुल्क (मद्य धोरण) घोटाळ्याच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा नोटीस बजावली आहे. यावर केजरीवाल काय प्रतिक्रिया देणार याकडं लक्ष लागलं आहे. देशात थंडीचाही जोर वाढताना दिसत आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com