esakal | पुण्याला केंद्राची मोठी भेट ते राज्यात उद्यापासून काय सुरू, काय बंद? ; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

aaj divasbharat.j

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

पुण्याला केंद्राची मोठी भेट ते राज्यात उद्यापासून काय सुरू, काय बंद? ; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. हा विकेंड लॉकडाउन शुक्रवारी (ता.९)सायंकाळी सहा वाजता सुरु होत असून तो सोमवारी (ता.१२)सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडे केली. या मागणीनंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या परिक्षांबाबत महत्त्वाचं विधान केलं. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. विशेष म्हणजे या डॉक्टरांना कोरोनाची लसही देण्यात आली आहे. डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून असा आग्रह केलाय की, कोरोना लशीच्या खरेदी आणि वितरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्यांची भुमिका वाढवली जावी तसेच लशीच्या निर्यातीवर तात्काळ रोख लावावी. त्यांनी काल 8 एप्रिल रोजी हे पत्र लिहलं आहे


कैरो- इजिप्तमध्ये दक्षिणेकडील लक्सर शहरामध्येच तीन हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सुवर्णनगरीचे अवशेष सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी संशोधकांनी राजा तुतानखामेन याच्या मुलाची कबर शोधून काढली होती, त्यापाठोपाठचे हे सर्वांत मोठे संशोधन मानले जात आहे. वाचा सविस्तर-

लंडन- ब्रिटनच्या महाराणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप यांचं निधन. वाचा सविस्तर-

मुंबई- मुंबईत सोमवारी सकाळी 8 पर्यंत लॉकडाऊन; जाणून घ्या, काय सुरू? काय बंद? वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- देशातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून पाकिस्तानला लस निर्यात करणे योग्य आहे, का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर-

मनोरंजन- शुक्रवारी, 9 एप्रिलला त्याचा वकिल साब नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी तो खास थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.  वाचा सविस्तर-

पुणे- राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार त्याबाबत तपशीलवार माहिती...वाचा सविस्तर-

पुणे- केंद्र सरकारने पुणे जिल्हाला मोठी भेट दिली आहे. पुणे जिल्ह्याला २ लाख ४८ हजार कोरोना लशीचे डोस प्राप्त झाले आहेत. वाचा सविस्तर-

मुंबई- आज जर खरंच महाराज असते तर १०० कोटी जमा करायला लावणाऱ्यांचा थेट कडेलोट केला असता, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. वाचा सविस्तर-

हेल्थ- कोरोना काळात सेक्स लाईफ कसं असायला हवं?. वाचा सविस्तर-

हेल्थ- कुठलाही आजार झाला, तर सर्वसामान्यपणे अॅलोपॅथी औषधांकडे आपला कल असतो. पण, याच काळात एका फायदेशीर उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी.  वाचा सविस्तर-