esakal | देशात कोरोनाचं थैमान ते अमेरिकेत कॅपिटल हिल परिसर लॉकडाऊन; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

breakfast news

राज्यासह देश विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी वाचा

देशात कोरोनाचं थैमान ते अमेरिकेत कॅपिटल हिल परिसर लॉकडाऊन; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री दिला. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. शनिवारी महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडली यामध्ये गृहमंत्र्यांवरील आरोप आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा झाली. 

'होय! आम्ही वर्षभरापासून रस्त्यावरच, आमची पुन्हा तयारी'; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर, लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांनी जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. वाचा सविस्तर

लोकलच्या गर्दीत ओळख पटण कठीण असल्याने सचिन वाझे मोबाइल  ऑफीसला ठेवून ठाण्याला लोकलने गेल्याचं तपासात समोर आलं आहे. वाचा सविस्तर

बैठक काँग्रेसची; चर्चा शिवसेना, राष्ट्रवादींच्या नेत्यांची... महाविकास आघाडीत समन्वयाची नितांत गरज असल्याचा सूर प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत उमटला. गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण, खासदार संजय राऊत यांची वक्तव्ये आणि टाळेबंदी याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाचा सविस्तर

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दररोज विक्रमी रुग्णांची नोंद होत आहे. वाचा सविस्तर

पुण्यात मिनी लॉकडाऊन पण निर्बंधाबाबत स्पष्टता नसल्यानं नागरिकांना काही प्रश्न पडले आहेत. नेमके काय आहेत निर्बंध? वाचा सविस्तर 

युएस कॅपिटल बिल्डिंगजवळ एका गाडीने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी कॅपिटल बिल्डिंग सील केली.  वाचा सविस्तर

भारतात होत असलेल्या घटनांवर अमेरिकेचे मौन का, असा तक्रारीचा सूरही राहुल गांधींनी आळवला. वाचा सविस्तर

मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

फेसबुकवर एका युजरने शशांकवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली. या युजरला शशांकनेही खडेबोल सुनावले. 'अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा उत्तर देऊ शकतो. कलाकारांशी आदराने वागा, पुण्य लाभेल', असं शशांक संबंधित ट्रोलरला म्हणाला.  वाचा सविस्तर

loading image