esakal | पुणे, मुंबईसह देशात कोरोनाचा उद्रेक तर राज्यात लॉकडाऊनची चर्चा; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

duparchya batmya

राज्यासह देश विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुणे, मुंबईसह देशात कोरोनाचा उद्रेक तर राज्यात लॉकडाऊनची चर्चा; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सचिन वाझे प्रकरणी आता एनआय़एनं त्याची आणखी एक गाडी ताब्यात घेतली आहे. तसंच सचिन वाझे प्रकरणावरून वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करायचा की नाही यावरून नेत्यांमध्ये मतभेद आहेत. मुख्यमंत्र्यांनी लॉरकडाऊनचे संकेत दिले असले तरी राज्य सरकारमधील काही नेत्यांचा सूर मात्र वेगळाच आहे. येत्या एक एप्रिलपासून कामगार कायदा लागू केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे नोकरदारांचा पगार, पीएफ, कामकाजाची वेळ यामध्ये बदल होऊ शकतो. 

एनआयएने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक आलिशान गाडी ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. वाचा सविस्तर

NIAने राऊतांसारख्या बडबड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि वाझेचा वाली कोण? या प्रश्नाची उकल केली पाहिजे", असं ट्वीट संजय निरूपम यांनी केलं.  वाचा सविस्तर

देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाच उद्रेक बघायला मिळत आहे.  वाचा सविस्तर

लॉकडाऊन टाळायचं असेल तर निर्बंधाचे पालन व्हायला हवे. कोणतेही निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातात असं राजेश टोपेंनी म्हटलं.  वाचा सविस्तर

राज्याची आणि शहरांची आर्थिक घडी नीट बसायला हवीच पण लोकांचा जीव वाचवण्याला आमचं प्राधान्य असणार आहे", असे सूचक विधान राज्याचे मंत्री आणि मुंबई (शहर)चे पालकमंत्री असलम शेख यांनी केले.  वाचा सविस्तर

नवीन श्रम कायदा (New Labour Laws) लागू झाल्यास नोकरदाराच्या पगार, पीएफ कामकाजाची वेळ आणि ओव्हर टाइम  यासारख्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.  वाचा सविस्तर

देशभरातील नागरिकांसाठी पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही अजूनही तुमचं पॅन कार्ड (Permanent Account Number) तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलं नसेल, तर ते लवकर लिंक करून घ्या.  वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सुरु असलेली घसरण आजही पाहायला मिळाली. या वर्षभरात सोन्याच्या किंमतीत तब्बल पाच हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली.  वाचा सविस्तर

प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; येत्या २ एप्रिल रोजी या गायकाचं नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला येणार होतं.  वाचा सविस्तर

loading image