
म्यानमार लष्कराशी संबंधित अनेक व्हिडिओदेखील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले आहेत.
गुवाहाटी : म्यानमारमधील लष्करी राजवटीच्या हुकूमाखाली काम करण्यास तयार नसलेल्या सहा पोलिसांनी भारतात बेकायदा प्रवेश करत आश्रय घेतला आहे. म्यानमारला लागून असलेल्या मिझोराम सीमेवरून ते आत घुसले असून सध्या सरछीप जिल्ह्यात थांबले आहेत. एका पोलिसाने स्वत:बरोबर पत्नी आणि मुलालाही बरोबर आणले आहे. म्यानमार आणि मिझोरामदरम्यान ४०४ किलोमीटरची सीमा आहे.
- आम्ही का परत जावं? ‘टाईम’ च्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी
म्यानमारच्या या सहा पोलिसांनी तीन मार्चला सीमा ओलांडली. सामान्य जनतेने सुरु केलेले आंदोलन दडपून टाकण्याचा लष्करी अधिकाऱ्यांचा आदेश पाळायची इच्छा नसल्याने आपण पळून आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना अन्न आणि पाणी पुरविण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली आहे. या आठ जणांशिवाय आणखीही काही नागरिक सीमेवरील विविध भागांमधून मिझोराममध्ये दाखल झाल्याचे वृत्त असले तरी त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. म्यानामरमधून मोठ्या प्रमाणावर लोक भारतात घुसण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने सीमेवरील सुरक्षा जवानांना सावध राहण्याची सूचना दिली आहे.
- भारतीयांच्या हाती अमेरिकेची सूत्रे; राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं कौतुक
‘युट्यूब’कडून कारवाई
बँकॉक : म्यानमारमधील लष्करी राजवटीकडून चालविल्या जाणाऱ्या पाच युट्यूब वाहिन्या ‘यूट्यूब’ने बंद केल्या आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी नियमांचा भंग केल्याचा आरोप या कंपनीने केला आहे. याशिवाय, म्यानमार लष्कराशी संबंधित अनेक व्हिडिओदेखील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले आहेत.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)