संशोधनासाठी युरोपला चला; आयसीएसएसआर, युरोपीय महासंघात करार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 29 October 2020

शैक्षणिक संशोधनातील आदान प्रदानाबाबत भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) व युरोपियन महासंघ यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे भारतातील तरुण संशोधकांना आता युरोपातील नामवंत विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये अधिक सुलभपणे प्रवेश मिळू शकेल. भारत व युरोपीय देशांमधील अशा प्रकारचा हा  दुसरा करार आहे.

नवी दिल्ली - शैक्षणिक संशोधनातील आदान प्रदानाबाबत भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) व युरोपियन महासंघ यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे भारतातील तरुण संशोधकांना आता युरोपातील नामवंत विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये अधिक सुलभपणे प्रवेश मिळू शकेल. भारत व युरोपीय देशांमधील अशा प्रकारचा हा  दुसरा करार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या करारानुसार संशोधन करू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांना युरोपियन संशोधन परिषदेकडून (ईआरसी) फेलोशिपही मिळू शकेल. युरोपियन महासंघाचे राजदूत ह्युगो ऍस्टेटो व आयसीएसएसआरचे सचिव प्रा. व्यंकट कुमार यांनी ऑनलाईन कार्यक्रमात करारावर स्वाक्षऱ्या केल्या. युरोपीय महासंघाच्या मारिया क्रिस्तानिया रूसो, युरोपीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा. जीन पिएरे बौगुईगॉन, आयएसएसआरचे अध्यक्ष व यूजीसीचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते. 

Bihar Election 2020 - पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान

या करारामुळे ज्या भारतीय तरुणांना आता युरोपातील संशोधकांबरोबर मिळून काही संशोधन करायचे असेल त्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी निवड आयसीएसएसआर निवड करेल. युरोपीय महासंघाने गेल्या सहा वर्षांत भारताबरोबर समाजविज्ञान व मानववंशशास्त्र यासारख्या विषयांतील शैक्षणिक संशोधनातील देवाणघेवाण  वाढविली आहे. कोरोनामुळे सध्या या प्रक्रियेला ब्रेक लागला असला तरी यासाठी युरोपात जाण्यास उत्सुक असणाऱ्या तरुणांची वाढली संख्या आहे.

रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा

करार ‘विन-विन’ स्वरूपाचा प्रा. पटवर्धन म्हणाले, की भारताला वैज्ञानिक व समाजविज्ञानासारख्या विषयांतील संशोधनाची दीर्घ परंपरा आहे. युरोप व भारतातील मानवी वस्ती, नागरीकरण व सांस्कृतिक मूल्यांबाबतच्या संशोधनासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल.  २००७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने पहिल्या वर्षी ६२ भारतीय तरुणांना शोधनासाठी परवानगी व अभ्यासवृत्ती दिली होती. हा नवा करार येथील तरुण संशोधकांसाठी विन-विन'' स्वरूपाचा ठरेल व त्यांना नव्या संधी प्राप्त होतील असा विश्‍वास प्रा. बौगुईगॉन यांनी व्यक्त केला.

फक्त 1 रुपयात पोटभर जेवण!

मोठ्या संधी उपलब्ध होणार
हा करार म्हणजे भारत व युरोपीय देशांतील शैक्षणिक सहमतीचा पहिला महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. यामुळे भारतीय व युरोपीय संशोधकांना आपापल्या ज्ञानाचे व अनुभवांचे आदानप्रदानही सुरळीतपणे करता येऊ शकतो, असे मारिया रूसो यांनी सांगितले. आगामी काळात युरोपमध्ये या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार असून त्याचा भारतातील तरुण निश्‍चित लाभ घेतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets go to Europe for research ICSSR Agreement in the European Federation