Viral Video | लिटल क्वीनचा क्युट डान्स; शाळेच्या मैदानातील व्हिडिओ तुफान व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

सोशल मीडियावर या चिमुकलीचा डान्स लोकांना आवडत आहे.

लिटल क्वीनचा क्युट डान्स; शाळेच्या मैदानातील व्हिडिओ तुफान व्हायरल

रोज सोशल मीडियावर (social media)अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, जे हसवतात, मनाला भुरळ घालतात आणि कधी कधी वेगळी छाप सोडतात. आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही, याचा अंदाज हा व्हायरल व्हिडिओ पाहून लावता येईल, ज्यात लहान मुलं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर शाळकरी मुलांच्या (school kids) डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत आहे, जो युजर्सला खूप आवडलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, लहान गोंडस मुले बादशाहच्या जुगनू गाण्यावर डान्स स्टेप्स करत आहेत, पण या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका लहान मुलीने आपल्या डान्स मूव्ह्जने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर या चिमुकलीचा डान्स लोकांना आवडत आहे. तुम्ही व्हायरल व्हिडिओ देखील पाहू शकता.Viral Video

हेही वाचा: Viral Video: दुकानदाराने बनवला मॅगी आईस्क्रीम रोल! नेटकरी म्हणाले...

आजकाल बादशाहचं (Badshah) जुगनू गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरलं आहे. नुकतंच या गाण्यावर एका लहान मुलीचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नुकताच डीजे मॉन्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्याला अनेक लोक पसंत करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मी लहान मुलामध्ये अशी एनर्जी कधीच पाहिली नव्हती. त्या मुलीचा हा व्हिडिओ मला आश्चर्यचकित करतो." हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 176 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. युझर्स बाळाच्या डान्स मूव्ह्जचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा: Viral Video : मित्रांसोबत पार्टीसाठी 'या' पठ्ठ्याने चक्क बुक केली मेट्रो!

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे तर एक्सप्रेशनतर खूप मस्त आहेतच, हाता-पायांच्या चालीही अप्रतिम असतात. इंटरनेटवर मुलाचं टॅलेंट आणि एक्सप्रेशन पाहून लोक त्यांचं कौतुक करत आहेत.व्हिडिओवर कमेंट्स आणि कौतुक सुरूच आहे. कुणी मुलीच्या डान्स मूव्ह्जचं कौतुक करतंय, तर कुणी तिच्या एक्सप्रेशन्स आणि क्यूटनेसवर कमेंट्स करत आहेत. एका युझरने लिहिले की, "ती स्टार आहे आणि ती स्वतःला किती एन्जॉय करतेय." आणखी एका युझरने लिहिले की, "जर तुम्हाला भैय्या डान्स शिकायचा असेल, तर या मुलीकडून शिका, तुम्ही ती चांगले शिकवाल."

Web Title: Little Girl Dances To Badshahs Jugnu Song In Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..