लॉकडाऊन १७ मेनंतरही सुरूच राहणार? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केल्या सूचना

Lockdown
Lockdown
Updated on

नवी दिल्ली : देशावर घोंघावत असलेल्या कोरोना संकटामुळे १७ मेपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन यापुढेही असाच सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

१७ मे नंतर देशात लॉकडाऊनचे स्वरुप कसे असावे? याबाबत १५ मे पर्यंत पर्याय सुचविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.११) मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली आहे. या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. संपूर्ण जिल्हा रेड झोन म्हणून घोषित करण्याऐवजी कंटेन्मेंट भाग रेड झोन म्हणून जाहीर करावा आणि उर्वरित जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

तसेच नियमित रेल्वे गाड्यांऐवजी कमी थांबे असणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात, अशा प्रकारच्या सूचनाही यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. कोरोनामुळे संपूर्ण जगातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे देशभरातील कोरोनामुक्त राज्यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने योजना आखाव्यात, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. 

कामगार आपापल्या राज्यांत परतू लागले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस कामगारांची गरज भासू शकते. ज्या राज्यांतून कामगार जात आहेत आणि ज्या राज्यांमध्ये ते जात आहेत, अशा दोन्ही राज्यांमध्ये कामगारांच्या समस्या डोके वर काढतील. मात्र, पुढील १० दिवसांत त्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था संबंधित राज्य सरकारची आहे. मात्र, यावेळी तपासणी करून त्यांना सोडण्यात यावे आणि ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येतील त्यांच्यावर उपचार करावेत, अशा सूचना पंतप्रधानानी यावेळी केल्या. 

मोदी पुढे म्हणाले, 'कदाचित यामुळे कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकते, मात्र, देशाला कोरोनामुक्त करण्याच्यादृष्टीने हरप्रकारे प्रयत्न चालू ठेवावेत. राज्यातील आर्थिक घडामोडींना वेग देण्यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्नशील राहावे. यासाठी उद्योग आणि कामगारांशी संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठीही प्रयत्न करावेत.' 

कोरोना या महामारीमुळे अनेक विदेशी कंपन्या आपल्या देशात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे इकॉनॉमी झोन करण्यासंदर्भात आणि अशा कंपन्यांना आवश्यक ती मदत करण्यासंदर्भातही राज्य सरकारांनी प्रयत्न करावेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com