लोजपात फूट : चिराग पासवान यांची अध्यक्षपदावरून हाकालपट्टी

chirag-paswan main.jpg
chirag-paswan main.jpg

पाटणा : बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षात काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष टोकाला पोचला असून काका पशुपतीनाथ पारस आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी पक्षाच्या घटनेचा हवाला देतानाच चक्क चिराग पासवान यांचीच पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली असून चिराग यांनीही पाच बंडखोर खासदारांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आजचा दिवस बिहारच्या राजकारणात मोठ्या राजकीय नाट्याचा ठरला. चिराग यांचे काका पशुपतीनाथ पारस यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. याच बैठकीमध्ये चिराग यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर चिराग यांनी पाचही बंडखोर खासदारांची हकालपट्टी केली.

chirag-paswan main.jpg
दीर्घकाळ केंद्राला 150 रुपयांत लस देणं परवडणारं नाही; भारत बायोटेकचा खुलासा

पारस गटाने माजी खासदार सूरजभानसिंह यांची लोकजनशक्ती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून येत्या पाच दिवसांत पक्षाचा नवा अध्यक्ष निश्‍चित करण्यात येईल. आता पक्षाचे राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार सूरजभानसिंह यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. चिराग यांनी देखील आज त्यांच्या समर्थकांसोबत व्हर्च्युअल बैठकीत संवाद साधत त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट हे आपले आंदोलन सुरूच राहणार असून बाकी मंडळी संघटनेमध्ये काम करत राहतील असे त्यांनी स्पष्ट केले

वडिलांनी स्थापन केलेला पक्ष एकसंध राहावा म्हणून मी खूप प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही. पक्ष हा मला आईसारखा असून आईला कुणीही धोका देता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता मोठी असते. पक्षावर विश्‍वास ठेवणाऱ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो.

-चिराग पासवान, नेते, लोकजनशक्ती पक्ष

chirag-paswan main.jpg
इस्रायली दुतावासाबाहेरील स्फोटातील संशयितांचे फुटेज जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान चिराग यांनी मोठी चूक केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये राहून (एनडीए) त्यांनी संयुक्त जनता दलाविरोधात (जेडीयू) काम केले. यामुळेच आम्ही नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला होता. चिराग यांच्याकडे अनुभव नसल्याने आम्ही पशुपतीनाथ पारस यांना पाठिंबा दिला आहे.

- चौधरी मेहबूब अली कैसर, खासदार लोकजनशक्ती पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com