Lok Sabha Eection 2024 : ज्या गावात पायी जायला लागतात ४ दिवस, तिथे १५९ मतदारांसाठी हेलिकॉप्टरने पोहोचले EVM

डोंगरातून वाट काढत जिथे जावे लागते अशा गावात हे अधिकारी हेलिकॉप्टरने गेले
Lok Sabha Eection 2024
Lok Sabha Eection 2024 esakal

Lok Sabha Eection 2024 :

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पूर्ण झाला असून अद्याप तीन टप्प्यातील मतदान पार पडायचे बाकी आहे.  लोकसभेच्या रणधुमाळीत मतदान, प्रचार, भाषणं, सभा या सगळ्या गोंधळात एक गोष्ट चर्चेत आली आहे. आजवर मतदारांनी मतदान केंद्राकडे जायचे असते. पण भारतात एका गावात चक्क EVM मशिनच मतदारांकडे गेले आहे.

होय, मतदानाशिवाय कोणीही वंचित राहू नये, मतदानाचा हक्क सगळ्यांना बजावता यावा १५९ लोकसंख्या असलेल्या गावात इलेक्शन अधिकारीच हेलिकॉप्टरने पोहोचले. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या बडा भंगाल या गावात हे अधिकारी पोहोचले होते.

Lok Sabha Eection 2024
Lok Sabha Election 2024 : मोदींकडे तिघांचा रिमोट ; राहुल गांधी यांची जगन, पवन, बाबू यांच्यावर टीका

हिमाचल प्रदेशात अशी अनेक गावे आहेत. जिथे पोहोचणे सोपे नाही, अशा गावात मतदान प्रक्रिया राबवण्याठी मतदान अधिकारी गावात पोहोचले. सोबत लागणारी कागदपत्रे आणि मशिन घेऊन अधिकारी हेलिकॉप्टरने पोहोचले.

विशेष गोष्ट म्हणजे या गावात पोहोचण्यासाठी चक्क चार दिवस लागतात. जिथे पोहोचण्यासाठी रहदारीचा रस्ता नीट नाही. डोंगरातून वाट काढत जिथे जावे लागते अशा गावात हे अधिकारी हेलिकॉप्टरने गेले.

Lok Sabha Eection 2024
Lok Sabha Election 2024 : मतदानावेळी ‘उत्तर’मध्ये सर्वाधिक ‘प्रश्‍न’; ९५३ जणांनी वापरला १९५० च्या हेल्पलाइनचा पर्याय

2011 मध्ये पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ आणि तत्कालीन ऊन फेडरेशनचे अध्यक्ष त्रिलोक कपूर हेलिकॉप्टरमधून बडा भंगल पंचायतीमध्ये पोहोचले आणि लोकांना संबोधित केले. यानंतर 2018 मध्ये प्रथमच बैजनाथचे तत्कालीन आमदार मुलख राज प्रेमी यांनी हेलिकॉप्टरमधून बडा भंगालला भेट दिली.

विशेष म्हणजे आजपर्यंत एकही नेता मतदानाच्या वेळी प्रचारासाठी आलेला नाही. हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम पंचायत असलेल्या बडा भंगलमध्ये सध्या राहणाऱ्या १५९ मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. येथील निवडणुकीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com