पोलिस प्रेमीयुगलाला म्हणाले; चला मंदिरात...

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

दोघांचे एकमेकांवर प्रेम. प्रेमाबद्दल घरच्यांना समजल्यानंतर विरोध झाला. दोघे पळून गेल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. याच वेळी प्रेमीयुगल चौकीत दाखल झाले.

सीतापूर (उत्तर प्रदेश): दोघांचे एकमेकांवर प्रेम. प्रेमाबद्दल घरच्यांना समजल्यानंतर विरोध झाला. दोघे पळून गेल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. याच वेळी प्रेमीयुगल चौकीत दाखल झाले. दोघांनी विवाहाची तयारी दाखवल्यानंतर पोलिसांनी मंदिरात विवाह लावून दिला.

पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीने दरवाजा ठोठावला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराहिमबाद येथील ज्ञानेंद्र कुमार व प्रियांका देवीचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांकडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. प्रियांकाने घरातून पळ काढला. ज्ञानेंद्रकडे गेल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियांकाच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल करत असताना प्रेमीयुगल चौकीत दाखल झाले. आम्हाला विवाह करायचा आहे, म्हणून पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कुटुंबियांची समजूत काढली आणि चौकीबाहेर असलेल्या मंदिरात जाऊन दोघांना विवाह लावून दिला.

प्रेमविवाह केला अन् कायमचाच निघून गेला...

दरम्यान, विवाहानंतर दोघे प्रचंड खूष होते. विवाहाची चर्चा परिसरात रंगल्यामुळे प्रसारमाध्यमे घटनास्थळी दाखल झाली. केवळ पोलिसांमुळेच आमचा आजविवाह होऊ शकला, असे सांगताना त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love couple marriage by up police in sitapur