श्रीनगरमध्ये २५ वर्षांतील नीचांकी तापमान; गोठलेल्या दल सरोवरावरून पायी न जाण्याची सूचना 

जावेद मात्झी - सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 15 January 2021

गेल्या २५ वर्षांतील हे नीचांकी तापमान आहे. २० जानेवारी १९९१ मध्ये शहरात किमान तापमान उणे ११.८  तर ३१ जानेवारी १९९३ मध्ये उणे १४. ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. 

श्रीनगर - काश्‍मीरमधील प्रसिद्ध दल सरोवरचा बहुतेक सर्व भाग गुरुवारी गोठला. श्रीनगरमध्ये काल रात्री पारा उणे ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. गेल्या २५ वर्षांतील हे नीचांकी तापमान आहे. २० जानेवारी १९९१ मध्ये शहरात किमान तापमान उणे ११.८  तर ३१ जानेवारी १९९३ मध्ये उणे १४. ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. 

सरोवर गोठले असले तरी त्यावरुन चालणे धोकादायक असल्याने तसे न करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला आहे. उपायुक्त डॉ. शाहीद इक्बाल चौधरी म्हणाले, ‘‘गोठलेल्या पाण्यावर चालण्याचे साहस लोकांनी करू नये, यासाठी परिसरात राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत.’’ गोठलेल्या दल सरोवरावर चालणे धोकादायक आहे. त्यामुळे ते टाळा, असे ट्विट त्यांनी केले आहे. एका प्रसिद्ध डॉक्टर म्हणाले की, बर्फावर खेळताना बुडून मरण पावलेल्यांमध्ये नऊ वर्षांखालील मुलांची संख्या ५० टक्के आहे.  बर्फावरुन वाहने चालविताना मृत्यू पावलेल्यांमध्ये २४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांची संख्या जास्त आहे. 

हे वाचा - अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई

दल सरोवरावरून चालविली जीप
दल सरोवर १९६०च्या दशकात गोठले होते.आताही ते असेच गोठले असल्याने स्थानिकांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तत्कालीन जम्मू-काश्‍मीर राज्याचे प्रमुख पंतप्रधान बक्षी गुलाम मुहमद यांनी त्यावेळी सरोवराच्या हजरतबल किनाऱ्याजवळ सुमारे २० मिनिटे जीप चालविली होती. त्यानंतर गोठलेल्या पाण्यावर चालण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती आणि पुढे याला जणू उत्सवाचे रूप आले, अशी आठवण स्थानिक सांगतात. 

हे वाचा - Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: low temperature in Srinagar