मध्यप्रदेश पोटनिवडणूकीत काँग्रेसनं लावला जोर; प्रचारगीत होतंय व्हायरल

kamalnath and shivrajsinh chauhan
kamalnath and shivrajsinh chauhan

भोपाळ: मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या 22 आमदार समर्थकांसह कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. ज्यामुळे त्यावेळेसचं 15 महिन्यांचं कमलनाथ सरकार ढासळलं होतं. नंतर मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी भाजपचं सरकार स्थापन केलं होतं. आतापर्यंत कॉंग्रेसच्या 3 आमदारांचे निधन झाले असून 3 आमदारांनी पक्ष सोडला आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये 28 जागांवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. जर कॉंग्रेसला पुन्हा एकदा सत्ता मिळवायची असेल तर, कॉंग्रेसला 28 पैकी 20 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवावा लागेल.

 भाजपाच्या वतीने ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाजपाची बाजू संभाळत आहेत. इकडे कॉंग्रेसही प्रचारात मोठी आघाडी घेताना दिसत आहे. सध्या कॉंग्रेसने सचिन पायलट यांनाही मध्यप्रदेशात प्रचारासाठी उतरवलं आहे. कॉंग्रेसने प्रचारासाठी एक गाणं तयार केलं आहे, जे सध्या सोशल मीडियावर चांगलच प्रसिध्द होताना दिसत आहे. या गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे आहेत. 

गद्दारों का छोड़ के साथ,
कांग्रेस का थामो हाथ,
एमपी पुकारे दिल से,
लाओ कमलनाथ फिर से..!
मध्यप्रदेश पुकारे दिल से, कमलनाथ फिर से..
 हे गाणं कॉंग्रेसच्या प्रचारात सगळीकडे दिसत आहे.

या मध्यावधी होत असलेल्या निवडणुकीत 28 पैकी 16 जागा ग्वाल्हेर-चंबळ भागातील आहेत. हा भाग ज्योतिरादित्य सिंधियाचा गड मानला जातो. मालवा-निमाड विभागात 7 जागा आहेत. तर काही जागा बुदेलखंडमधील आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार असं सांगितलं जातंय की, हा भाग जरी ज्योतिरादित्य सिंधियाचा गड असला तरी भाजपाच्या अंतर्गत वादामुळे कॉंग्रेसला या भागात फायदा होऊ शकतो. यामुळे आता ज्योतिरादित्य सिंधिया यांची लोकप्रियता कमी झाली की नाही, हे निवडणूकांच्या निकालानंतरच समजेल. कॉंग्रेस सातत्याने सिंधिया आणि सोडून गेलेल्या आमदारांना धोकेबाज म्हणून प्रचार करत आहे. अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य सिंधियादेखील यास त्याच पद्धतीने उत्तर देत आहेत.

मध्यप्रदेशात 2020 च्या मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह काही काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्यामुळं मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचं कमलनाथ सरकार पडलं होतं. त्यावेळेस आलेल्या राजकीय भूकंपात मध्यप्रदेशचे काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यासह जवळपास 22 आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. यास भाजपाने  'ऑपरेशन लोटस' असं नाव दिलं होतं.  त्यावेळेस भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले असल्याचा आरोप कमलनाथ यांनी भाजपवर केला व राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर आरोप केले होते. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप त्यांनी केला होता. 

 मध्य प्रदेशमध्ये  २० मार्च 2020ला  विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण त्यापूर्वीच कमलनाथ यांनी आपला निर्णय जाहीर केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या. आता या राजकीय भूकंपानंतर मध्यप्रदेशातील कॉंग्रेस मोठ्या जोमाने रिंगणात उतरत असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com