Madhyapradesh : सेक्स करू न शकल्याने आदिवासी तरुणाचा सरकारवर १० हजार कोटींचा दावा

आदिवासी तरुणाने सरकारवर ठोकला १० हजार कोटींहून अधिक रकमेचा दावा
Madhyapradesh
Madhyapradeshesakal

रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. एका आदिवासी तरुणाने सरकारवर 10006 कोटींहून अधिक रकमेचा दावा ठोकला आहे. एका सामूहिक बलात्कार प्रकरणात तरुणाला तुरुंगात टाकण्यात आले होते. नंतर त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तुरुंगात असल्याने शारीरिक संबंध ठेवता येत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. यासाठी त्याला शासनाकडून भरपाई हवी आहे .

Madhyapradesh
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये तरुणाची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता झाली. कांतीलाल भील उर्फ कांटू म्हणतो की सेक्सचा आनंद ही देवाने मानवाला दिलेली देणगी आहे. चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात असल्याने त्याला त्याचा आनंद घेता आला नाही.

Madhyapradesh
Farali Misal Recipe: शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्याने त्याचे जग पूर्णपणे बदलले, असा आरोप त्याने केला आहे. त्यांच्या पत्नी-मुलांना आणि वृद्ध आईला खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या कुटुंबाकडे अंडरगारमेंट्स घेण्याइतके पैसेही नव्हते. तुरुंगात कांटू कपड्यांशिवाय थंडी आणि उकाडयाचा सामना करावा लागला.

Madhyapradesh
Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

कांतीलालने सांगितले की, तो पाच वर्षांपासून त्रस्त आहे. आधी तीन वर्षे पोलिस त्रास देत राहिले. यानंतर तो दोन वर्षे तुरुंगात राहिला. कोणताही गुन्हा न करता दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. कुटुंब रस्त्यावर उतरले. आता तो मुलांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकत नाही. पोलिसांनी त्याला जबरदस्तीने खोट्या प्रकरणात अडकवले.

Madhyapradesh
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

कांतीलालचे वकील विजय सिंह यादव म्हणाले की, मानवी जीवनाचे कोणतेही मूल्य निश्चित केले जाऊ शकत नाही. पोलिस आणि राज्य सरकारमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. निर्दोष असूनही त्यांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळेच त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात राज्य सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे.

Madhyapradesh
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

आरोपीच्या कुटुंबात वृद्ध आई मीरा, पत्नी लीला आणि ३ मुले आहेत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. मुलांचे शिक्षण चुकले. आता, त्याला समाजात परत येण्यासाठी आणि रोजगार शोधण्यात अडचणी येत आहेत. या कारणास्तव हा दावा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com