
पुणे महापालिकेने शहरातील पाणी समस्येकडे लक्ष देण्यासाठी प्रभागनिहाय उप अभियंत्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अनेक अडचणी येत आहेत, उप अभियंत्यांकडून हद्दीचा वाद घातला जात आहे, त्यामुळे आता विभागनिहाय उपअभियंता आणि शाखा अभियंता नियुक्त केला जाणार आहे. एका विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाण्याची टाकी व त्याची वितरण व्यवस्थेला संबंधित उपअभियंता जबाबदार असणार आहे. `सकाळ’ने पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा आवाज प्रशासनाच्या कानावर घातल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.