

येवल्यात बुधला आणि कातरा डोंगराखाली असलेल्या वनखात्याच्या अखत्यारित डोंगरावर वणवा पेटलाय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. पण हवेमुळे आग आटोक्यात येत नाहीय. जंगलात मोरांसह वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ते संकटात सापडण्याची शक्यता आहे.