esakal | महाविकास आघाडीला वैचारिक अधिष्ठान नाही; विनय सहस्रबुद्धे यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

vinay-sahasrabuddhe

‘खुर्चीला मिठी, कारण कायद्याची भीती,’ असे सध्याच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे. त्यांच्या एकत्र येण्यामागे भाजपाचा विरोध हे वरवर दिसणारे कारण असले तरी विधिनिषेधशून्य राजकारण करून सत्तेची फळे चाखण्यासाठी चाललेली त्यांच्यातील चढाओढच अंतिमतः त्यांचा घात करेल, असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे‌ यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीला वैचारिक अधिष्ठान नाही; विनय सहस्रबुद्धे यांची टीका

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली - ‘खुर्चीला मिठी, कारण कायद्याची भीती,’ असे सध्याच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे. त्यांच्या एकत्र येण्यामागे भाजपाचा विरोध हे वरवर दिसणारे कारण असले तरी विधिनिषेधशून्य राजकारण करून सत्तेची फळे चाखण्यासाठी चाललेली त्यांच्यातील चढाओढच अंतिमतः त्यांचा घात करेल, असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे‌ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरण, पश्चिमी बंगाल, केरळ, आसाममधील निवडणुका आदी मुद्द्यांवर 'सकाळ'शी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सरकारला  नैतिक अधिष्ठान नाही. सत्तेसाठी तडजोड करून ते एकत्र आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाझे हे शिवसेनेशी संबंधित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे आरोप आहेत. काँग्रेसही या प्रकाराला पाठीशी घालत असल्यामुळे या सर्व पक्षातील आमदारांची  अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेनेबरोबर भाजपच्या फेरजुळणीच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, की हे सर्व जर-तर चे प्रश्न आहेत, ते काल्पनिक आहेत. 

बांगलादेश दौऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षराची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ

ममतांना मतविभाजनाचा फटका बसणार
सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीत कोलकता शहरातील काही मतदारसंघांची जबाबदारी सांभाळणारे सहस्रबुद्धे या निवडणुकीबद्दल  भाष्य करताना ते म्हणाले, अंडरकरंट म्हणतात तशी प्रभावी पण काहीशी अव्यक्त लाट भाजपाच्या बाजूने सर्वदूर दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराच्या शैली विरोधात जनतेचा रोष सर्वत्र दिसून येत आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचार आणि गुंडगिरी यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात काँग्रेस-डावे हे ममता यांच्या विरोधात ठाकल्याने मतविभाजनाचा फटका त्यांना बसणार आहे. सध्याच्या परिस्थितीत तेथे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो !

प. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ८० टक्के मतदान, १९१ उमेदवारांचं नशिब EVMमध्ये कैद

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येण्यामागे कोणतेही वैचारिक व धोरणात्मक अधिष्ठान नाही.  सध्यातरी हिरेन हत्या आणि शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपातून परस्परांना वाचविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सरकारमधून कोणीही बाहेर पडले, तर अन्य पक्ष त्यांची पोलखोल करतील ही भीती‌ या सर्वांना  आहे.
- विनय सहस्रबुद्धे ,खासदार, भाजप

Edited By - Prashant Patil