esakal | "ममतांनी संदेश दिलाय, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं"

बोलून बातमी शोधा

Sanjya Raut_Mamata Banerjee

"ममतांनी संदेश दिलाय, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं"

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : "नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं, हा महत्वाचा संदेश ममता बॅनर्जी यांनी दिला आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही टिपण्णी केली.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, तसेच नंदीग्रामच्या जागेवरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आहे. त्यांनी सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला. या सर्व बाबींवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "ममता दीदींनी हा संदेश दिलाय की, मोदी-शहा हे अजिंक्य नाहीत त्यांनाही पराभूत करता येतं." ममतांचा हा विजय ऐतिकाहासिक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: ममतांचा विजय हा भाजपच्या 'दीदी ओ दीदी'ला सडेतोड उत्तर - अखिलेश यादव

"पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेत्यांनी एक कृत्रीम हवा निर्माण केली होती, त्या पोकळ वादळाचा हा पराभव आहे. एका जखमी वाघिणीनं हा एकहाती विजय खेचून आणला आहे. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा विजय आहे" असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: उत्तर प्रदेश : कासावीस झालेल्या रुग्णांना त्यानं पुरवला ऑक्सिजन; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पश्चिम बंगालमध्ये भाजपने केंद्रीय संस्थांनाही कामाला लावले होते. बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय झाला आहे. ममताजींनी एकहाती विजय मिळवला आहे, अशा शब्दांत राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे.