Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

Manipur political developments: १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जात आहे.
Manipur legislative assembly

Manipur legislative assembly

esakal

Updated on

Political Developments in Manipur : भाजप हायकमांडने मणिपूरमधील आपल्या सर्व आमदारांसह NDA मित्रपक्षांच्या आमदारांना तातडीने चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय हालाचीलींना वेग आला आहे. ३१ जानेवारी रोजी जारी केलेल्या एका निर्देशानुसार सर्व आमदारांना २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राष्ट्रीय राजधानीत उपस्थित राहण्यास सांगितले गेले आहे, तर अनेक आमदार आज १ फेब्रुवारी रोजीच दाखल होणार आहेत.

फेब्रुवारी २०२५ पासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्याने आणि विधानसभेचे कामकाज स्थगित असल्याने, हे पाऊल अत्यंत महत्त्वाच्या वेळी उचलण्यात आले आहे. १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवटीला एक वर्ष पूर्ण होत असल्याने, बैठकीच्या वेळेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ज्यामध्ये संभाव्य राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपचा समावेश आहे.

१३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जात आहे. रिपोर्टमधून अशी माहिती समोर येत आहे की, एका आठवड्यात मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकते. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर १३ फेब्रुवारी २०२५ पासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.

Manipur legislative assembly
Budget Expectations 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बैठकीचा अजेंडा अधिकृतपणे जाहीर केलेला नसला तरी, या आवाहनामुळे संभाव्य राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

Manipur legislative assembly
Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

मणिपूरमधील प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, सल्लामसलतीची वेळ अत्यंत महत्त्वाची असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आमदार आणि पक्षाचे अधिकारी दिल्लीतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com