Manish Sisodia : मनिष शिसोदिया यांच्या कोठडीत 7 मे पर्यंत वाढ

एक तक्ता बनवून सिसोदिया यांच्याविरोधातील पुरावे द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले.
Manish Sisodia
Manish Sisodia esakal

नवी दिल्ली ः मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सात मे पर्यंत वाढ केली आहे. याच प्रकरणात आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच भारत राष्ट्र समितीच्या(बीआरएस) नेत्या के. कविता यांची कोठडी अलीकडेच न्यायालयाने वाढवली होती.

Manish Sisodia
Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) दाखल करावयाच्या दोषारोप पत्राच्या अनुषंगाने न्यायालयात स्वतंत्र सुनावणी झाली. यावेळी एक तक्ता बनवून सिसोदिया यांच्याविरोधातील पुरावे द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नऊ मार्च २०२३ रोजी सिसोदिया यांना अटक झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com