Viral Video : लग्नमंडपात चक्क पापडावरून झालं भांडण, वऱ्हाडी लोकांना बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : लग्नमंडपात चक्क पापडावरून झालं भांडण, वऱ्हाडी लोकांना बेदम मारहाण

लग्न समारंणात लहान मोठ्या गोष्टींनी भांडणे झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण एका पापडावरून देशातील सर्वात साक्षर राज्यात भांडणे होऊन सहा जण जखमीही झाले आहेत. वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जास्तीचे 'पापड' मागितले मात्र त्यांना नकार देण्यात आला यानंतर ही हाणामारी सुरू झाली.

हेही वाचा: लिव्ह-इन रिलेशनशीपवर केरळ उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण; म्हणाले, आनंदासाठी...

केरळमधील अलप्पुझा येथून समोर आला आहे. मुत्तोम येथील एका विवाह मंडपात लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं झालं. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर देशावर आता 'मंकीपॉक्स'चं संकट; केरळ, दिल्लीनंतर हिमाचलमध्ये आढळला संशयित रुग्ण

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना चप्पलने मारताना दिसत आहेत. एकमेकांना मारण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि टेबलचाही वापर केला. याप्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी 10 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्यांची ओळख पटवली जात आहे. या घटनेत वराच्या काही मित्रांनी आणखी पापड मागितले होते, जे देण्यास केटरिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. यावरुनच हे भांडण सुरू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Web Title: Marriage Fight Kerala 6 Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Keralamarriage