INDIA Alliance : मायावतींचा 'बसप' इंडिया आघाडीत जाणार? काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांचं मोठं विधान

‘‘इंडिया आघाडीची दारे बहुजन समाज पक्षासाठी खुली आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हायचे का नाही, हे सर्वस्वी मायावती यांच्यावर अवलंबून आहे,’’ असे प्रतिपादन उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी रविवारी केले.
INDIA Alliance
INDIA Alliance esakal

नवी दिल्ली: ‘‘इंडिया आघाडीची दारे बहुजन समाज पक्षासाठी खुली आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हायचे का नाही, हे सर्वस्वी मायावती यांच्यावर अवलंबून आहे,’’ असे प्रतिपादन उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी रविवारी केले.

काँग्रेसचे सरचिटणीस असलेले पांडे म्हणाले, ‘‘बहुजन समाज पक्षाने इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, त्यांनी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.’’

‘‘ उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी समाजवादी पक्षाला मदत करत आहे, पाठिंबा देत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटप लवकरच निश्‍चित होईल आणि सर्व शंका दूर होतील,’’ असेही त्यांनी सांगितले.

INDIA Alliance
Amit Deshmukh : काँग्रेसच्या पडझडीच्या काळात अमित देशमुखांनी घेतली ठोस भूमिका; म्हणाले, विलासरावांनाही...

‘‘समाजवादी पक्ष आणि काँग्रेस दोघेही उत्तर प्रदेशातील छोट्या पक्षांशी चर्चा करत असून, त्यांनी ‘इंडिया’ आघाडीत सहभागी व्हा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल,’’ असे सांगून पांडे म्हणाले, ‘‘काही पक्षांनी आघाडीमध्ये विनाअट सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे, तर काही पक्षांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे जागावाटपाला थोडा वेळ लागत आहे. सर्व मुद्द्यांवर महिनाअखेरीपर्यंत तोडगा काढण्यात येईल.’’

‘‘राष्ट्रीय लोक दलाने ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. परंतु, राहुल गांधी यांची न्याय यात्रा पश्‍चिम उत्तर प्रदेशातून जात आहे. त्या यात्रेच्या माध्यमातून जनतेचा पाठिंबा मिळविण्यात आम्ही यशस्वी होऊ,’’ असे पांडे म्हणाले.

INDIA Alliance
R Ashwin Wife Post : अश्विनच्या पत्नीची इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट; म्हणाली, आमच्या आयुष्यातील ते सर्वात कठीण 48 तास...

‘प्रियांका, राहुल यांचे स्वागतच’

सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक न लढविण्याचे ठरविले आहे. त्याबाबत विचारले असता अविनाश पांडे म्हणाले, ‘‘सोनिया गांधी या पक्षाच्या आधारस्तंभ आहेत. जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. उत्तर प्रदेश आणि रायबरेली व अमेठी मतदारसंघाचा आपण कायम भाग असू, तसेच कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्यासाठी काम करत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांतून गांधी घराण्यातील सदस्याने निवडणूक लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. रायबरेली आणि अमेठीतून निवडणूक लढवायची का नाही याचा निर्णय प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनीच घ्यायचा आहे. त्यांनी तसा निर्णय घेतल्यास आनंदच होईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com