esakal | डोनाल्ड ट्रम्प यांचा 'भक्त' तुम्ही पाहिला का? उभारलयं ट्रम्प यांचं मंदिर!
sakal

बोलून बातमी शोधा

Bussa-Trump

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हान्का आणि जावई जेर्ड कुश्नेर यांच्यासह अमेरिका प्रशासनातील अनेक बडे अधिकारी हे तीन दिवस भारत दौऱ्यावर आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा 'भक्त' तुम्ही पाहिला का? उभारलयं ट्रम्प यांचं मंदिर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जनगाव (तेलंगणा) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा सुरू होती. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ट्रम्प यांचा असाच एक 'भक्त' फॅन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेत्यांची मंदिरे दक्षिण भारतात आपण पाहिली आहेत. यामध्ये आता ट्रम्प यांचाही समावेश झाला आहे. तेलंगणमधील जनगाव या गावात बुसा कृष्णा नावाच्या एका व्यक्तीचे नाव आहे. त्याने आपल्या घराच्या मागील अंगणात ट्रम्प यांचा ६ फूट उंचीचा पुतळा उभारला असून तो नित्यनेमाने पूजा करत आहे. हा पुतळा उभारण्यासाठी त्याला एक महिना कालावधी लागला असल्याची माहिती मिळत आहे. 

- साबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प यांनी गांधींचे नाव न लिहिता 'हे' लिहिले
 
'एएनआय' वृत्तसंस्थेने ट्रम्प यांच्या या भक्ताची भेट घेतली. तेव्हा एएनआयशी बोलताना बुसा म्हणाला, ''ट्रम्प सर हे माझ्यासाठी देव आहेत. ते आपल्या देशात येणार असल्याने मला खूप आनंद झाला आहे. तसेच ट्रम्प यांना भेटण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी दहशतवाद रोखण्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे.'' 

तो म्हणाला, ''भारत-अमेरिका या दोन देशांतील संबंध आणखी घट्ट व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रत्येक शुक्रवारी उपवासही करत आहे. मला आयुष्यात एकदा ट्रम्प यांना भेटायचे आहे. त्यामुळे मला ट्रम्प यांच्याशी भेटण्याची एक संधी द्यावी, अशी मी भारत सरकारला विनंती करतो.''

- Namaste Trump:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात, सचिन, विराटसह डीडीएलजे आणि शोलेचाही उल्लेख

बुसाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल असलेल्या त्यांच्या भक्तीमुळे गावकरीही त्याला प्रेमाने 'ट्रम्प' म्हणू लागले. त्याचे खरे नाव बुसा कृष्णा आहे, पण गावातील सगळे त्याला ट्रम्प कृष्णा म्हणतात. गावातील बुसाचे घर 'ट्रम्प हाऊस' म्हणून ओळखले जाते. यावर गावकऱ्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही; उलट त्याच्या या हटक्या भक्तीचे सगळेजण कौतुक करतात,' अशी माहिती कोन्नेचे गाव प्रमुख आणि बुसाचे मित्र रमेश रेड्डी यांनी दिली.

- ट्रम्प भारतात आल्यानंतर मोदींचा 'तो' फोटो व्हायरल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हान्का आणि जावई जेर्ड कुश्नेर यांच्यासह अमेरिका प्रशासनातील अनेक बडे अधिकारी हे तीन दिवस भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान भारत-अमेरिका या दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या बैठका आणि करार होणार आहेत.

loading image