Coal Mine Blast : कोळसा खाणीत भीषण स्फोट!, दहा कामागारांचा मृत्यू ; अनेक कामगार अडकले असल्याचीही भीती

coal mine explosion : स्फोट इतका शक्तिशाली होता की खाणीतील कामगार बाहेर पडू शकले नाहीत.
Meghalaya Coal Mine Blast

Meghalaya Coal Mine Blast

esakal

Updated on

Meghalaya coal mine explosion : मेघालयातील ताशखाई परिसरातील कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मेघालय पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचले होते. शिवाय, खाणीत अडकलेल्या इतर कामगारांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, ताशखाई कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला, ज्यामुळे कामगार आत अडकले. स्फोट इतका शक्तिशाली होता की खाणीतील कामगार बाहेर पडू शकले नाहीत. तर सर्व मृत कामगार आसामचे असल्याचा संशय आहे.  प्रशासनाकडून याबाबत अधिकृत पुष्टी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक सूत्रांनुसार, मृतांपैकी एक कामगार आसामच्या कटिगरा भागातील बिहारा गावातील असल्याची माहिती समोर आली आहे.

बचावकार्यात अडथळा येऊ नये म्हणून प्रशासनाने आजूबाजूचा परिसर सील केलाा आहे आणि सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला, खाणीतील गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाड हे संभाव्य कारण मानले जात आहे, मात्र याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

Meghalaya Coal Mine Blast
Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

या अपघातानंतर, कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आणि बेकायदेशीर खाणकामांबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने आश्वासन दिले आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com