राष्ट्रगीताचा अपमानप्रकरणी ममता बॅनर्जींना कोर्टाकडून समन्स

ममता बॅनर्जी यांना 2 मार्च 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Mamata Banerjee
Mamata Banerjeeटिम ई सकाळ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर एका भाजप नेत्याकडून राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भाजप नेत्यांनी कोर्टात ममता बॅनर्जीविरोधात याचिका दाखल केली होती. यावर आता शिवडी न्यायालयाकडून ममता बॅनर्जी यांना समन्स बजावण्यात आले आहे.

Mamata Banerjee
‘प्रत्येक विवाहाला हिंसक अन् प्रत्येक पुरुषाला बलात्कारी म्हणता येणार नाही’

मुंबईतील एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खाली बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना त्या मध्येच थांबल्या. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान होतो, असा युक्तीवाद करत भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ममता बॅनर्जीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भाजप नेत्यांनी कोर्टात ममता बॅनर्जीविरोधात याचिका दाखल केली. यावर ममता बॅनर्जी यांना शिवडी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांना 2 मार्च 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com