इंजेक्शनवेळी वेदना होणार नाही; IIT मध्ये सुक्ष्मसुईचा शोध

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

आयआयटी खडगपूरमधील संशोधकांनी सूक्ष्म सुई विकसित केली आहे. या सुईच्या मदतीने रुग्णांना वेदनारहित पद्धतीने औषध देणे शक्य होणार आहे. म्हणजेच मोठ्या औषधाचे कण या सुईच्या माध्यमातून सहजपणे रुग्णांच्या शरीरात सोडता येऊ शकतील. ही माहिती संस्थेने शनिवारी एका निवेदनाद्वारे दिली.

कोलकता - आयआयटी खडगपूरमधील संशोधकांनी सूक्ष्म सुई विकसित केली आहे. या सुईच्या मदतीने रुग्णांना वेदनारहित पद्धतीने औषध देणे शक्य होणार आहे. म्हणजेच मोठ्या औषधाचे कण या सुईच्या माध्यमातून सहजपणे रुग्णांच्या शरीरात सोडता येऊ शकतील. ही माहिती संस्थेने शनिवारी एका निवेदनाद्वारे दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लशीसाठी वापर 
आयआयटी खडगपूरच्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाने ही सूक्ष्म सुई विकसित केली आहे. या सुईच्या व्यासाचा आकार कमी करण्याबरोबरच त्याची क्षमताही वाढविली आहे. यामुळे सुई त्वचेवर टोचताना ती तुटण्याची भीती कमी होणार आहे. इन्सुलिन शरीरात सोडण्याबरोबरच भविष्यात या सूक्ष्म सुईचा वापर कोरोनाच्या लशीसाठी होऊ शकतो, अशी आशा निवेदनात व्यक्त केली आहे.

Unlock 4 मध्ये 1 सप्टेंबरपासून काय बदलणार?

या सुईचे मुख्य संशोधक प्रा. तरुण कांती भट्टाचार्य म्हणाले की, इन्सुलिन शरीरात सोडणे किंवा ज्या आजारांसाठी लसिका प्रणालीद्वारे औषधोपचार केले जातात, त्यासाठी ही सुई उपयोगी ठरणार आहेत. या आजारांमध्ये त्वचेसह कर्करोगाचे काही प्रकारांचा समावेश आहे. अगदी कोरोनाच्या लसीकरणातही सूक्ष्म सुईचा वापर करता येऊ शकेल.

50 वर्षे विरोधी बाकावर बसावे लागेल म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला राहुल गांधींनी केला फोन

सूक्ष्मपंपाचीही रचना 
‘‘त्वचाविरोधी बलाचा सामना करू शकेल अशी उच्च शक्तीची पारदर्शक कार्बन सूक्ष्म सुई आम्ही तयार केली आहे. या सुईप्रमाणेच पॉलिमर मेटल आणि त्वचेच्या पटलावर आधारित सूक्ष्मपंपाची रचनाही तयार केली आहे. यातून औषधांच्या कणांचा प्रवाह नियंत्रितपणे व योग्य प्रमाणात वाढवता येतो.

औषधाची मात्रा नियंत्रित पद्धतीने देण्यासाठी सूक्ष्म सुई व सूक्ष्म पंपाचे एकत्रीकरण आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. त्वचेमधून देण्यात येणाऱ्या औषधांसाठी या उपकरणाचा व्यापक वापर होऊ शकतो, असेही प्रा. भट्टाचार्य यांनी सांगितले. 

प्रा. भट्टाचार्य म्हणाले... 
- अनेक प्रकारच्या संशोधन व विकासातून अत्‍यंत प्रभावी ठरणाऱ्या सूक्ष्मसुईची निर्मिती. 
- सामान्य सुईतून शरीरात औषध सोडताना होणाऱ्या वेदनांपासून रुग्णाची मुक्तता होईल. 
- या सुईची चाचणी प्राण्यांवर केली असून त्याचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. 
पेटंट अर्ज 
भारतात या शोधाच्या स्वामित्व हक्कासाठी (पेटंट) संशोधकांनी अर्ज केला असून हे संशोधन ‘आयईईई’ आणि ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्रालय तसेच सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने या संशोधनासाठी निधी पुरविण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: micro needle administer drugs painless iit kharagpur researchers develop