मानलं बुवा! 'आराम हराम है' म्हणत केंद्रीय मंत्र्यांचं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल'!

टीम ई-सकाळ
Wednesday, 20 January 2021

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला इथं नाईक यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता.

पुणे : राजकारणात काही माणसांना वक्तृत्व शैलीमुळं ओळख मिळते तर काही आपल्या कामामुळं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण त्यांची संख्या त्यामानानं कमी असते. याचंच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा गेल्या आठवड्यात अपघात झाला. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण 'आराम हराम है' म्हणत त्यांनी हॉस्पिटलमधून आपलं काम सुरूच ठेवलं. 

हेही वाचा - SC On Farmers Protest : ट्रॅक्टर परेडबाबतचा निर्णय दिल्ली पोलिसांचा; आम्ही आदेश देणार नाही

माजी खासदार निलेश राणे यांनी नाईक यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये ते हॉस्पिटलमध्ये असूनही काम करत असल्याचे दिसत आहे. आपल्या कर्तव्याशी कसं एकनिष्ठ असावं ह्याचं उत्तर. श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांनी पत्नीला सुद्धा गमावले पण ते आपल्या कर्तव्यापासून दूर गेले नाहीत. तब्येत ठीक नाही, तरी ते काम करत आहेत. तुमचा अभिमान वाटतो, असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

हे वाचा - स्वत: संकटात असूनही भारताने निभावला शेजार धर्म; 6 देशांना पाठवतोय कोरोना लस

दरम्यान, नाईक यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती गोमेकॉ हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.  

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला इथं नाईक यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. येल्लापूर येथून ते गोकर्णला येत होते. या अपघातात नाईक यांच्या पत्नी आणि सेक्रेटरीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नाईक यांची रवानगी गोव्यातील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. 

हे वाचा - देशात 30 जानेवारीला 2 मिनिटं मौन; केंद्र सरकारचा आदेश

पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना बुधवारी रात्री देण्यात आली. अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांच्या मुलाने ही माहिती त्यांना दिली. तेव्हा त्यांच्या रक्तदाबात बदल झाला होता. मात्र, गुरुवारी त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State Shripad Naik work from hospital during treatment