E -Tourist Visa पूर्ववत; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास 156 देशांतील नागरिकांना होणार आहे. विशेष म्हणजे E tourist Visa मार्च 2020 पासून स्थगित करण्यात आला होता.
E-Tourist visa News
E-Tourist visa Newsसकाळ डिजिटल टीम

भारत भ्रमण करु इच्छित असणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून E tourist Visa पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास 156 देशांतील नागरिकांना होणार आहे. विशेष म्हणजे E tourist Visa मार्च 2020 पासून स्थगित करण्यात आला होता. (E -Tourist Visa News)

कोरोना काळात नागरी सुरक्षितेला प्राधान्य देण्यासाठी 156 देशांतील E tourist Visa स्थगित करण्यात आला होता आता मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडून E tourist Visa पूर्ववत करण्यात आलाय. सोबतच भविष्यात अमेरिका आणि जपानच्या नागरिकांना E tourist Visa चा कालावधी (१० वर्षे) वाढवण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

E-Tourist visa News
काश्मीर फाईल्स पाहून काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणतात, 'सगळं काही अर्धवट, नुसतीच हिंसा!'

२७ मार्चपासून वाहतूक सुरु होत आहे.यामुळे आता पर्यटकांना भारत भ्रमण करण्याचा मार्ग मोकळा झाला.E tourist Visa च्या मदतीने जवळपास १५६ देशातील नागरीक आता भारतात पर्यटनाचा आनंद लुटणार. या सोबत यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेतही याची सकारात्मक भर पडणार असून पर्यटन क्षेत्रात रोजगाराला चालना मिळणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com