
''सबका साथ, सबका विकास या नुसार भाजपचे सरकार काम करत आहे.''
'मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्या'; साक्षी महाराज यांचं वक्तव्य
कानपूर : भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, असे वक्तव्य उन्नावमधील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.
''सध्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या ३२ कोटींहून अधिक झाली आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला गेलेला अल्पसंख्याकांचा दर्जा काढून घेण्यात यावा,'' असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
- सलाम महिला पोलिस अधिकाऱ्याला! आरोपी निर्दोष सुटताच 'शौर्य पदक' केले परत
वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला पाहिजे. या कायद्यानुसार दोनहून अधिक मुले असलेल्यांना सरकारी योजनांचे फायदे देऊ नयेत, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
काश्मीरसंबंधीचे कलम ३७०, राम मंदिर आणि तिहेरी तलाक यासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय भाजप सरकारने धडीस नेले आहेत. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसच्या सरकारांनी केल्यापेक्षा जास्त विकास गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने केला आहे, असा दावा करून ते म्हणाले, ''सबका साथ, सबका विकास या नुसार भाजपचे सरकार काम करत आहे.''
- नाराज नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये बदल सुरु; 2 प्रदेश प्रमुखांचा राजीनामा
विरोधकांवर टीका
शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना साक्षी महाराज म्हणाले, ''देशातील शेतकरी शेतात काम करत आहे आणि काँग्रेसचे शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधीपक्ष बंदूक ठेवत आहेत.''
ते पुढे म्हणाले, मोदी सरकारने किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये देण्याचे ठरवले. आता शेतकऱ्यांसाठी नवीन कायदे केल्याने शेतकऱ्यांना भविष्यात फायदे होतील. मात्र, काँग्रेस एनआरसी प्रमाणे या नवीन कृषी कायद्यांचा विरोध करत आहे. पण त्यांना यात यश मिळणार नाही.
- दिल्लीत शेतकरी नाही, खलिस्तान आणि पाकिस्तानचे नारे लावणारे लोक; BJP आमदाराचं वक्तव्य
भाजपचे सर्व खासदार आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधून नवीन कृषी कायद्यांच्या फायद्यांविषयी माहिती देतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Minority Status Muslims Should End Says Bjp Mp Sakshi Maharaj Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..